Copparam Shreyas Hareesh Dainik Gomantak
क्रीडा

Bike Racer Accident: दुर्दैवी! 13 वर्षांच्या भारतीय रेसरचे चॅम्पियनशीप दुर्घटनेत निधन, देशभरातून हळहळ व्यक्त

Indian Bike Racer Accident: भारताच्या 13 वर्षांच्या बाईक रेसरचे चॅम्पियनशीपमध्ये झालेल्या अपघातात निधन झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे.

Pranali Kodre

13-year-old Indian bike racer died ln a crash : शनिवारी भारतासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोप्पारम श्रेयस हरिश नाव असलेल्या 13 वर्षांच्या भारताच्या बाईक रेसरचे अपघातात निधन झाले आहे. ज्या वेगावर त्याने प्रचंड प्रेम केले होते, त्याच वेगाने त्याचे प्राण घेतले आहेत.

श्रेयस भारताचा प्रतिभाशाली बाईक रेसर होता. त्याला भविष्यातील स्टारही मानले जात होते, मात्र आता ही सर्व स्वप्न केवळ स्वप्नच राहिली आहेत.

श्रेयस चेन्नईत झालेल्या नॅशनल मोटारसायकल रेसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत घडलेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. बंगळुरू किड म्हणून ओळखला जाणारा श्रेयस 200सीसी मोटारबाईक चालवत होता.

त्यावरून तो घसरला आणि तिसऱ्या राऊंडवेळी त्याचे हेल्मेट निघाले, त्याचवेळी त्याच्या मागून येणारा दुसरा रेसर नियंत्रण राखू शकला नाही आणि त्याची बाईक श्रेयसच्या अंगावरून गेली. ज्यामुळे श्रेयसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे निदान करण्यात आले.

श्रेयसच्या निधनानंतर या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या सर्व रेस मद्रास मोटार स्पोर्ट्स क्लबने रद्द केल्या आहेत.

श्रेयसचा जन्म 26 जुलै 2010 रोजी झाला होता. त्याला आधीपासूनच रेसिंगची आवड होती. त्याने नुकताच 10 दिवसांपूर्वी त्याचा 13 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याने मे महिन्यातच एक ऐतिहासिक कामिगिरीही नोंदवली होती.

तो स्पेनमध्ये झालेल्या टू-व्हिलरच्या वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय रेसर होता. त्याने स्पेनमध्ये झालेल्या FIM Mini-GP वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग घेतला होता.

श्रेयसने भारतात झालेल्या FIM Mini-GP स्पर्धतून कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने 2022 मध्ये चॅम्पियनशीपही जिंकली होती. त्याची प्रतिभा पाहून टीव्हीएसने त्याला रुकी कपसाठी निवडत त्याला ट्रेनिंग देऊन टीव्हीएसची बाईकही दिली होती. तो करत असलेली प्रगती पाहून तो भविष्यात त्याची प्रतिभा दाखवेल असे मत अनेकांनी व्यक्त केले होते.

मात्र, आता त्याचे निधन झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT