Piles |yoga  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga For Piles: पाइल्सपासून सुटका हवी असेल तर 'ही' 4 आसनं नियमित करावी

तुम्हालाही पाइल्सची समस्या असेल आणि या वेदनेपासून सुटका हवी असेल तर रोज करा ही योगासने करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Yoga For Piles: पाइल्सची समस्या अनेक लोकांना असते. ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये एनसच्या आत आणि बाहेर सूज येते. अनेक लोक या समस्येबद्दल उघडपणे बोलत नाही. अनेकांना रक्तस्त्राव सुरू होतो.

पण प्रत्येक वेळी असे घडतेच असे नाही. जर कोणाला ही समस्या असेल तर ती कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला सकस आहार घेणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्ही नियमितपणे योगासने करणे आवश्यक आहे.

पाइल्स आणि त्याच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी योगासन

  • पवनमुक्तासन

हे आसन करताना पोटावर थोडासा दबाव टाकल्याने गॅस पडण्यास मदत होते. पोटाच्या खालच्या भागात होणारा त्रासही कमी होतो. या योगामुळे स्नायूंचा ताण दूर होउन रिलॅक्स वाटते.

Yoga Tips
  • सर्वांगासन

हा योगा केल्याने रक्तप्रवाह चांगलो होतो. याउलट ते पाचक रसांचा प्रवाह कमी करण्यास देखील मदत करते. या पोझमध्ये थोडावेळ तसेच राहावे.

सर्वांगासन
  • अर्धमत्स्येंद्रासन

अर्धमत्स्येंद्रासनामध्ये वाकल्याने तुमच्या पचनसंस्थेला चालना मिळते. जस जसे पोटातील अस्वस्थता कमी होईल तस तसे तुम्हाला असे वाटेल की तुमची कमजोरी दूर झाली आहे. किमान पाच श्वासपर्यंत या स्थितीत रहा आणि नंतर दुसऱ्या बाजूला पुन्हा असेच करावे.

अर्धमत्स्येंद्रासन
  • बालमुद्रासन

बालमुद्रासनमुळे एनसच्या दिशेने रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. या प्रकरणात बद्धकोष्ठता कमी करण्यास देखील मदत करू शकते. हे आसन किमान एक मिनिट तरी करणे गरजेचे आहे.

बालमुद्रासन
  • मुळव्याधची समस्या असल्यास कोणत्या पदार्थांचे करावे सेवन

मुळव्याधची समस्या असल्यास हर्बल टी घ्या. हे मल मऊ करते, ज्यामुळे मल बाहेर निघण्यास मदत करते.

होल ग्रेन्समध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींच्या समस्येपासून आराम मिळतो.

मुळव्याध झाल्यास हिरव्या भाज्या खाव्या.

फायबर युक्त फळांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून खूप आराम मिळतो.

मूळव्याध असलेल्या रुग्णांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT