Year Ender 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year Ender 2022: यावर्षी सर्वाधिक सर्च केलेले आजार, वाचा एका क्लिकवर

Year Ender 2022: या वर्षात तुम्ही गुगलवर कोणते आजार आणि घरगुती उपाय सर्च केले आहे.

दैनिक गोमन्तक

नवे वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. 2022 हे वर्ष अनेक कारणांनी लक्षात राहणार आहे. याचं कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जग हादरुन गेले होते. अनेकांच्या त्यामुळे नोकऱ्या गेल्या होत्या. कोरोना संपत नाही तोपर्यंत जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या आजारांनीही लोकांना त्रास दिला. कोरोना महामारीत (Corona) अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही त्रास सहन करावे लागले. त्यामुळे गुगलवर या आजारांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. याबरोबरच त्यांच्या घरगुती उपचारांचाही शोध घेण्यात आला. या वर्षी इंटरनेटवर सर्वात जास्त शोधलेल्या आजारांबद्दल जाणून घेऊयात.

  • वजन कमी करण्याचे सोपे उपाय

लॉकडाऊननंतर (Lockdown) ज्या प्रकारे लोकांचे वजन वाढले, त्यामुळे अनेक समस्या वाढल्या. लोकांनी गुगलवर वजन कमी करण्याच्या अनेक उपाय शोधले आहेत. काहींनी सकस आहार घेण्यास सुरुवात केली. तर, काहींनी व्यायाम तर काहींनी योगा करण्यास प्राधान्य दिले.

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या टिप्स

अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने लोकांनी गुगलवर इम्युनिटी बूस्टिंग टिप्स शोधल्या आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुगलवर अनेक गोष्टीं सर्च केल्या गेल्या आहेत. जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर फळे, भाज्या कोणत्या आहेत असे अनेक उपाय शोधले गेले.

  • सर्दीवर उपाय

बदलत्या हावामानानुसार अनेकांना सर्दी, खोकला खूप होऊ लागला. त्यामुळे लोकांनी गुगलवर (Google) बरीच माहिती गोळा केली. तसेच, सर्दी, खोकला टाळण्यासाठी मार्ग आणि उपाय कोणते शोधले आहे.

  • कोरोना टाळण्याचे मार्ग

कोरोनाने (Corona) जगभरात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबद्दल एक दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे या दरम्यान लोकांनी गुगलवर कोरोना टाळण्याचे मार्ग शोधले. सॅनिटायझेशनपासून ते व्हेंटिलेटर आणि मेडिटेशनपर्यंत अशा अनेक गोष्टी गुगलद्वारे सर्च करण्यात आल्या.

  • बद्धकोष्ठता दूर करण्याचे मार्ग

कोरोना काळात लोकांनी अधिक काळ घरात राहावे लागले होते. या दरम्यान लोकांची जीवनशैली बदलली, जेवणाची वेळ बदलली आणि मानसिक दबाव वाढत गेला. याचा परिणाम म्हणून बद्धकोष्टतेचा त्रासदेखील अनेकांना सुरु झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT