Fruit Raita: आयुर्वेदानुसार 'फ्रूट रायता' आरोग्यदायी ठरतो का? वाचा एका क्लिकवर

फळांचा रायता खायला खूप चविष्ट असतो पण प्रत्येक चवदार पदार्थ फायदेशीर असावा असे नाही.
Fruit Raita | Fruit Raita Benefits
Fruit Raita | Fruit Raita BenefitsDainik Gomantak

Fruit Raita Benefits: फ्रूट रायता ही एक अशी डिश आहे, जी बहुतेक लोक खूप चविने खातात. काही लोक असे असतात की त्यांना दिवसातून एकदा फळ रायता (Fruit Raita) खावेच लागते. त्याशिवाय त्यांना त्यांचे अन्न अपूर्ण वाटते. तुमचाही या लोकांमध्ये समावेश असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रायता ज्या फळांपासून (Fruits) तयार केला जातो त्या सर्व गोष्टी आरोग्यदायी असतात. पण तरीही आयुर्वेदिक नियमानुसार फळ रायता आरोग्यदायी (Health) नाही. उलट ते पोटात जाऊन मोठ्या प्रमाणात विष बनवते, आपली पचनशक्ती बिघडवते आणि ते जास्त वेळ खाल्ल्याने चयापचयातील गंभीर समस्या उद्भवू शकतात.

  • आयुर्वेदात काय सांगितले आहे

आयुर्वेदानुसार दही(Curd) हे आरोग्यदायी आहे. तसेच कोणतीही व्यक्ती फळे खाऊन स्वतःला निरोगी ठेवू शकते. पण दही आणि फळ या दोन्हीमध्ये विरोधी गुणधर्म आहेत. म्हणजेच या दोघांचा पचनाचा स्वभाव आणि वेळ एकमेकांशी जुळत नाही.

दही पचायला जड असते. यामुळेच अनेकदा दही खाल्ल्यानंतर झोप येते. दही पचायला खूप वेळ लागतो. फळांमध्ये (Fruits) भरपूर फायबर असते आणि दह्यापेक्षा ते लवकर पचतात. यामुळे पोटासंबंधीत आजार वाढू शकतात.

या दोन्ही पदार्थांच्या विरुद्ध गुणांमुळे म्हणजेच पोटाच्या पचनात (Digestion) समस्या निर्माण होतात. विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होतात. जर ते दीर्घकाळ सेवन केले तर तीव्र चयापचय रोगाचा धोका असतो.

Fruit Raita | Fruit Raita Benefits
New Year Astro Tips : नवीन वर्षात या उपायांनी येतील 'अच्छे दिन'; पूर्ण होतील सर्व इच्छा

दही कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नये?

  • केवळ फळेच नाही तर अन्नामध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्यामध्ये लोक दही मिक्स करुन खातात, तर आयुर्वेदानुसार असे अजिबात करू नये…

  • दही नॉनव्हेजसोबत खाउ नये

  • जेवतांना दह्याचे सेवन टाळावे

  • ताक किेवा मठ्ठा प्यावे

  • तसेच तुम्ही कढी बनवून देखील सेवन करु शकता.

दही खाण्याची योग्य पद्धत कोणती?

  • दह्यामध्ये साखर टाकून सेवन करणे टाळा

  • तुम्ही दह्यापासून लस्सी तयार करून सेवन करू शकता.

  • जर तुम्हाला साधे दही खावेसे वाटत नसेल तर ते फराळाच्या वेळेत खा आणि त्यात जिरेपूड, काळी मिरी पावडर, बडीशेप इत्यादी मिसळून खा. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com