Yawning Effects On Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yawning Effects On Health: वारंवार जांभई येणे असू शकते 'या' 5 गंभीर आजारांचे लक्षण

Yawning Effects On Health: तर तुम्ही स्लीप एपनियाचा गंभीर समस्येने त्रस्त असू शकता.

दैनिक गोमन्तक

Yawning Effects On Health: आपल्यापैकी अनेकांना किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेकांना सतत जांभई देताना आपण पाहत असतो. ही सामान्य बाब दिसत असली तरीदेखील सतत येणाऱ्या जांभया शरीराच्या मोठ्या समस्येकडे इशारा करत असतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

सामान्यत: सतत जांभई देणे हे अपुऱ्या झोपेचे लक्षण मानले जाते. हे एक कारण आहेच मात्र काही शरीराच्या काही गंभीर समस्यांकडे या वेळीअवेळी येणारी जांभई लक्ष वेधतात. या समस्या कोणत्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1. स्लीप एपनिया (Sleep apnea or insomnia​)

स्लीप एपनिया हा झोपेसंबंधी गंभीर आजार आहे. यामध्ये श्वास पुन्हा पुन्हा थांबतो आणि थोड्यावेळाने पून्हा सुरु होतो. तज्ञांच्या मतानुसार, जर तुम्हाला रात्रभर झोपूनदेखील सकाळी थकवा जाणवत असेल तर तुम्ही स्लीप एपनियाचा गंभीर समस्येने त्रस्त असू शकता.

2. औषधे

जर कोणी औषधे घेत असेल तर त्यांना जांभयांचा त्रास होऊ शकतो. अँटीसाइकोटिक्स या अँटीडिप्रेसेंट जांभयांच्या रुपात बाहेर येऊ शकतात. त्यामुळे कोणतीही औषधे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घेतल्याशिवाय खाऊ नका.

3. ब्रेन डिसऑर्डर

जास्त वेळा जांभया देणे हे ब्रेन डिसऑर्डरचेदेखील लक्षण असू शकते. पार्किंसंस डिसीज, मल्टीपल स्केलेरोसिस आणि मायग्रेन यासारख्या आजारांमुळे जास्त जांभयाचा त्रास होतो.

4. ताणतणाव

तज्ञांच्या मतानुसार, जास्त ताणतणावामुळे देखील जांभया येऊ शकतात. वाढत्या वयानुसार ताणतणावात देखील वाढ होते. त्यामुळे ताणतणावाचे वेळीच व्यवस्थापन करणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी गरजेचे असते.

5. हृदय विकार( Heart Attack )

तज्ञांनी म्हटल्यानुसार, जर तुमच्या आजूबाजूला ऑक्सिजनची कमी असेल तर तुम्हाला जास्त जांभया येत असतात. त्यावेळी हार्ट अॅटॅक येण्याची देखील शक्यता आहे. मात्र ही एक फक्त शक्यता असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

SCROLL FOR NEXT