working day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ज्या कंपन्यांनी आठवड्यातून तीन सुट्टी दिल्या त्या झाल्या मालामाल

कोरोनाने आठवड्यात तीन सुट्ट्यांची संकल्पना केली शक्य

दैनिक गोमन्तक

कोणतीही कंपनी असेल तरी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी, ही संकल्पना आपल्याला शक्य वाटते का ? आपलं उत्तर नाहीच असेल मात्र ही संकल्पना शक्य केली आहे, ती कोरोनाने. कारण कोरोना संक्रमणाचा वेग सर्वोच्च असताना बहूतेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरीच काम करण्यासाठी निर्देश दिले. यामूळेच आठवड्यातून तीन दिवस सुट्टी या संकल्पनेचा उगम झाला. ही संकल्पना ज्या कंपन्यांनी अवलंबली त्या कंपन्या आता इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक पैसे कमवत असल्याची बाब समोर आली आहे. ( world's many companies starts trial for four day working week and results are good )

जगभरातील अनेक कंपन्या ही संकल्पना अवलंबत आहेत. अनेक कंपन्यांनी त्याची चाचणीही घेणे सुरू केले आहे, ज्यावरून असे दिसून आले आहे की, आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी करूनही कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली आहे आणि कंपन्या नफा कमावत आहेत. यूकेच्या एका कंपनीने जानेवारी 2020 मध्ये पाच ऐवजी चार कामकाजाच्या दिवसांसाठी फॉर्म्युला वापरण्यासाठी चाचणी सुरू केली. मात्र, कंपनीने याबाबत ग्राहकाला कोणतीही माहिती दिली नाही.

वर्कलोडमध्ये संतुलन आणण्यासाठी कंपनीने पर्यायी शिफ्टची प्रणाली देखील सुरू केली. काही कर्मचाऱ्यांना सोमवार ते गुरुवार तर काहींना मंगळवार ते शुक्रवारपर्यंत काम करण्यास सांगितले होते.

या कंपनीने जानेवारी 2020 पासून कर्मचार्‍यांच्या करारामध्ये आठवड्यातील चार कामकाजाच्या दिवसांचा पॅटर्न समाविष्ट केला. जेव्हा कंपनीने ही चाचणी सुरू केली तेव्हा तिचा नफा 30 टक्क्यांनी वाढला. यासोबतच उत्पादकताही 24 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने उत्पादकता मोजण्यासाठी टाइम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर वापरले. आता पूर्वीपेक्षा कमी तासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कंपनीला अधिक नफा मिळत होता.

काही वर्षांपूर्वीपर्यंत आठवड्यातून चार दिवस काम करण्याच्या संकल्पनेकडे संशयाने पाहिले जात होते. तथापि, कोविड-19 मुळे, हे कार्य मॉडेल आता स्वीकारले जात आहे. याकडे कामाच्या तासांमध्ये क्रांतिकारक बदल म्हणून पाहिले जात आहे. 1922 मध्ये फोर्ड मोटर कंपनीनेही कामाच्या वेळेत अशाच प्रकारचे बदल करण्याचा प्रयोग केला. त्यावेळी आठवड्यातील कामकाजाचे दिवस सहा वरून पाचवर आणण्याचा प्रयोग करण्यात आला. यानंतर, 1926 मध्ये, हे कंपनीचे कायमस्वरूपी धोरण बनले.

अनेक कंपन्यांच्या चाचण्यांमध्ये, आठवड्यातील चार कामकाजाचे दिवस यशस्वी असल्याचे वर्णन केले आहे. आइसलँडने 2015 आणि 2019 दरम्यान चार कामकाजाच्या दिवसांसह सर्वात लांब चाचणी चालवली आणि त्याचे परिणाम उत्कृष्ट होते.बर्‍याच मोठ्या कंपन्यांनीही चार कामकाजाच्या दिवसांसाठी अशाच प्रकारच्या चाचण्या घेतल्या. न्यूझीलंडमधील युनिलिव्हर कंपनी आणि जपानमधील मायक्रोसॉफ्ट कंपनीने अशाच प्रकारच्या चाचण्या घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT