World Thyroid Day 2023:
World Thyroid Day 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Thyroid Day 2023: थायरॉईडचे 'हे' लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध

दैनिक गोमन्तक

World Thyroid Day 2023: दरवर्षी 25 मे हा दिवस 'जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस'म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना थायरॉईडचा त्रास होत आहे.

थायरॉईडची काही लक्षणे अगदी स्पष्ट असतात. परंतु, त्याची वेळीच ओळख न झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. थायरॉईड रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस ओळखला जातो.

या दिवसाचा इतिहास

हा दिवस 2008 साली युरोपियन थायरॉईड असोसिएशन (ETA) च्या प्रस्तावावर अस्तित्वात आला. पब्लिक हेल्थ अपडेटमधील एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर असा अंदाज आहे की 200 दशलक्षाहून अधिक लोक थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत आणि यापैकी 50 टक्के प्रकरणे अशी आहेत की त्यांचे निदान होत नाही.

थायरॉईड ही गळ्याजवळ असलेली ग्रंथी आहे. हे मानेच्या आत आणि कॉलरबोनच्या अगदी वर असते. ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे, म्हणजेच तिला नलिका नसते. त्यातून हार्मोन्स तयार होतात. थायरॉईडची समस्या महिलांनामध्ये अधिक जाणवते .

थायरॉईडचे प्रकार

1. हायपर-थायरॉइड

2. हायपो-थायरॉइड.

हायपरमध्ये, हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, तर हायपोमध्ये, प्रमाण कमी होते. दोन्ही प्रकारच्या समस्यांमध्ये, हार्मोन्सचे उत्पादन संतुलित नसते.

थायरॉईडची मुख्य लक्षणे कोणती?

  • थकवा जाणवणे

  • केस गळण्याची समस्या

  • महिलांमध्ये मासिक पाळी वेळेवर न येणे

  • ताण येणे

  • अचानक घाम येणे

  • पुरेशी झोप न लागणे

  • वारंवार भूक लागणे

थायरॉईडचे कारण

ज्या कुटुंबात थायरॉईडची समस्या आहे किंवा त्यां कुटूबांतील लोकांना धोका जास्त असतो. टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो. वाढत्या वयामुळे, जास्त ताणतणाव, आधी केलेल्या थायरॉईड शस्त्रक्रिया आणि डाऊन किंवा टर्नर सिंड्रोम यामुळेही समस्या उद्भवू शकतात.

उपाय कोणते

  • दूध आणि दह्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामध्ये असलेले कॅल्शियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे थायरॉईडला आराम देतात.

  • ज्येष्ठमधाचे सेवन देखील खूप फायदेशीर आहे. तसेच थायरॉईडमध्ये कर्करोग वाढण्यापासून रोखते.

  • गहू आणि ज्वारीचा अधिक वापर करा. संपूर्ण धान्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्यात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT