World Motorcycle Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Motorcycle Day 2023: पावसाळ्यात प्रवास सुखकर करायचा असेल तर बाईकची घ्या अशी काळजी

भर पावसात तुमची बाईक तुम्हाला दगा तर देणार नाही यासाठी वेळीच बाईकची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Bike Care Tips in Monsson: आज आंतरराष्ट्रीय दिनासह जागतिक मोटरसायकल दिवसही आहे. बाईक चालवण्याची आवड असलेले लोक या दिवशी त्यांच्या बाईकवर लांबच्या प्रवासासाठी बाहेर पडतात.

तसेच पावसाच्यात बाईक चालवण्याचा आनंद देखील अनेक लोक घेत असतात.पण पावसाळ्यात बाईक चालवणे खूप अवघड काम आहे. पण भर पावसात तुमची बाइक तुम्हाला दगा देणार नाही याची काळजी घ्यावी.

पावसाळ्यात बाईकची काळजी कशी घ्यायला हवी याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही या टिप्स फॉलो केल्यात तर तुमची बाइक पावसाळ्यातही चांगलं मायलेज आणि परफॉर्मन्स देईल.

  • इंजिन ऑईल बदलायला हवं

पावसाळ्यात तुम्हीही जर लाँग ड्राइव्हचा विचार करत असाल तर बाईकची काळजी घेणे गरजेचे आहे. राइडवर जाण्यापुर्वी एकदा इंजिन ऑइल तपासावे. तसेच बाईची सर्विसिंग करावी.

  • ब्रेक्स आणि टायर्सची देखभाल

बाईकवर लाँग ड्राइव्हवर जाण्यापुर्वी ब्रेक आणि टायर्सची देखभाल करावी. कारण पावसाळ्यात ब्रेक फेल होण्याची आणि रस्त्यावर पाणी साचलेले असल्यामुळे बाईक स्लिप होण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात कुठेही लाँग ड्राइव्हवर जाण्यापुर्वी या दोन्ही गोष्टी तपासुन घ्यावे.

  • लाईटची काळजी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाईकवर लाँग ड्राइव्हवर जाण्यापुर्वी बाईकचे लाईट्स चेक करावे. पावसाच्या थेंबामुळे बहुतेकदा आपला प्रवास सुखद होण्याऐवजी त्रासदायक ठरु शकतो. म्हणूनच हेडलाईट चांगली असेल तर आपल्याला पावसाळ्यात कोठेही अंधारात जाताना काही अडचण निर्माण होणार नाही.

  • एअर फिल्टर स्वच्छ ठेवा

बाईकमध्ये बसवलेले एअर फिल्टर साफ करणे खूप महत्वाचे आहे. बरेचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्याचा इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणूनच वेळोवेळी एअर फिल्टर साफ करणे आवश्यक आहे.

  • बॅटरी चेक करा

आजकाल प्रत्येक ऑटोस्टार्ट येतात.पण पावसाळ्यात कधी कधी बॅटरी काम करत नाही. यामुळे बॅटरी चेक करावी. वायरिंगकडे नेहमी लक्ष द्या. बहुतेक बाईक वॉटर प्रूफ असतात पण मुसळधार पावसात यात पाणी जाऊ शकते.

  • बाईक चालवतांना कोणत्या वस्तु सोबत असणे गरजेचे

  • राइडिंग सूट

लाँग ड्राईव्हसाठी बाईक चालवताना केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी राइडिंग जॅकेट आणि पँट असणे देखील आवश्यक आहे. 

जॅकेट परिधान केल्याने रायडरची सुरक्षा तर होतेच पण त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वासही निर्माण होतो. यासोबतच रायडिंग सूटही खूप स्टायलिश लुक देतो.

  • फेस मास्क

फेस मास्क प्रवासादरम्यान उडणाऱ्या धुळीपासून रायडरचे संरक्षण करतो. तसेच चेहऱ्यालाही संरक्षण देतो. बाईक चालवताना अनेकदा डोळ्यात धुळीचे कण जाण्याचा धोका असतो, हा मास्क अनेक समस्यांपासून बचाव करतो. यामुळे बाईक चालवतांना फेस मास्क वापरावा.

  • हेलमेट

बाईक चालवताना हेल्मेट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अपघाताच्या वेळी बाईक राईडरचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट सर्वात जास्त उपयुक्त ठरते. चलन टाळण्यासाठी, लोक सहसा स्वस्त हेल्मेट खरेदी करतात. पण असे अजिबात सुरक्षित नाही. नेहमी ISI चिन्ह असलेले हेल्मेट वापरावे.

  • ग्लॉव्स

बाइक चालवताना ग्लॉव्स देखील खूप महत्वाचे आहेत. यामुळे बाईक राईडरच्या हातांना संरक्षण मिळते. हातांची पकडही ग्लोव्हजसह चांगली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT