World Heart Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Heart Day 2023: स्वयंपाकघरातील 'हे' 7 मसाले हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करू शकता.

Puja Bonkile

World Heart Day 2023: निरोगी आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे गरजेचे असते. रोजच्या जेवणात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांचा देखील हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मसाले अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. काही मसाल्यांमुळे हृदयाचे आजार दूर राहतात. हृदयाच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणार्‍या अनेक मसाल्यांमध्ये विलायची, दालचिनी, लवंग, धणे, बडीशेप लसूण, आलं, ओवा, हळद यांचा समावेश होतो.

  • दालचिनी

दालचिनी हा अक स्वयंपाक घरातील मसाल्याचा प्रकार आहे. यामध्ये असलेले घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. कारण ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. हे मधुमेहावरील औषधाला पर्याय नसले तरी उपचारात मदत करू शकते. दालचिनीचा वापर तुम्ही भाज्यांमध्ये करू शकता.

  • काळे मिरे

काळे मिरे मसाल्यांचा राजा मानला जातो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हा मसाला वजन कमी करण्यास मदत करतो. तेसच रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी सुधारतो. काळे मिरेमध्ये व्हॅनेडियम असल्यामुळे हृदयविकाराच्या धोका कमी होतो.

  • लाल मिरची

लाल मिरचीमध्ये कॅप्साइसिन असते. यामध्ये अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. यामुळे रक्तदाब कमी होतो. तसेच संधिवात आणि मधुमेहाची समस्या कमी होण्यास मदत मिळते. हे मुख्यतः दक्षिण-पश्चिम अमेरिकन पदार्थ आणि मेक्सिकन पदार्थांमध्ये आढळते.

  • हळद

हळद त्वचेसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हधदीचा वापर तुम्ही भाजीमध्ये किंवा दुधात टाकून करू शकता.

इतर मसाले

लसूण, आलं आणि धणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे मसाले कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ T20: हरवले न्यूझीलंडला, रडवले पाकिस्तानला! टीम इंडियाची मोठ्या विक्रमाला गवसणी; रचला नवा इतिहास

Chorao Island: चोहोबाजूंनी सुपारी, आंबा, फणसाची सावली आणि पर्यावरणाचा ध्यास; चोडण बेटावर भरलेले पहिलेच निसर्गसंमेलन

Illegal Pig Transport: कर्नाटकातून गोव्यात 53 डुकरांची बेकायदेशीर वाहतूक! अमानवीय वागणूकीचा ठपका; युवकाला दंड

Parra Crime: मारहाण करत जीवे घेण्याची दिली धमकी, कार-मोबाईलची नासधूस; पूर्ववैमनस्यातून राडा, दोघांना अटक

Mirabag: '..आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ'! जुवारी नदीवरील बंधाऱ्याविरोधात एल्गार, मिराबाग येथे ग्रामस्थांची बैठक

SCROLL FOR NEXT