World Environment Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो?

World Environment Day 2022:दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

विश्वात 5 जून हा दिन जागतिक पर्यावरण दिवस म्हणुन साजरा केला जातो. यंदा फक्त एक पृथ्वी ‘Only One Earth’ वर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. United Nations Environment Programme कडून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 1973 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे. (World Environment Day 2022 News)

‘Only One Earth’ या थीमच्या अनुषंगाने निसर्गाशी एकरूपतेने जगणे आवश्यक असल्याचा संदेश दिला गेला आहे. पृथ्वीच्या (Earth) संरक्षणासाठी आपण जागतिक स्तरावर पृथ्वीच्या संरक्षणासाठी, तिच्या रिस्टोअरसाठी आणि तिला सेलिब्रेट करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे यासंदर्भात जागृती करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

1972 स्टॉकहोम कान्फर्नस (Stockholm Conference) मध्ये “Only One Earth” ची घोषणा करण्यात आली होती. आज 50 वर्षांनंतरही तिचं महत्त्व तितकंच आहे. 1972 मध्ये स्टॉकहोममधील पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद पर्यावरण (Environment) हा मुख्य मुद्दा बनवणारी पहिली जागतिक परिषद होती.

2022 हा जागतिक पर्यावरणासाठी काम करणार्‍यांकरिता एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. कारण 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत असुन पर्यावरणावरील पहिली आंतरराष्ट्रीय बैठक म्हणून मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT