World Elder Abuse Awareness Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Elder Abuse Awareness Day: घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींशी असं वर्तन केल्यास होईल असा परिणाम

Puja Bonkile

World Elder Abuse Awareness Day: दरवर्षी 15 जून जागतिक वृद्ध अत्याचार दिन साजरा केला जातो. वडिलधाऱ्या व्यक्तीवरील अत्याचार आणि वाईट वागणूक थांबवणे आणि त्यांच्या काळजीबद्दल अधिकाधिक लोकांना जागरूक करणे हा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे.

वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी कोणीही थांबवू शकत नाही. व्यक्ती लहानाचा मोठा होता नंतर प्रौढ अवस्थेत जातो. परंतु अनेकदा असे दिसून येते की कुटुंबातील सदस्य मोठ्यांशी वाईट वागू लागतात.

जे काही वेळा हिंसेचे रूप घेते. आरोग्यापासून ते सामाजिक, वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन जागतिक स्तरावर वृद्धांप्रती सहानुभूती, प्रेम आणि आपुलकीची वृत्ती अंगीकारण्याच्या सूचना देत 15 जून 2011 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

(world elder abuse awareness day take care of elderly home with these 5 tips read full story)

तुमच्या घरात देखील वडीलधारी मंडळी असतील तर त्यांची मनापासून काळजी घेऊन तुम्ही त्यांचे आयुष्य चांगले बनवू शकता. हे केवळ त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर निरोगी मानसिकदृष्ट्याही चांगले असते.

  • वडिलधाऱ्या व्यक्तींशी ठेवावी चांगली वागणूक

  1. वडिलधाऱ्या व्यक्तींना फक्त प्रेमाची सर्वात जास्त गरज असते. जर तुम्ही त्यांना खोटे सांगत राहिलो तर त्यांचे मन तर अस्वस्थ होईलच, पण त्यांची तब्येतही दिवसेंदिवस ढासळत जाईल.

  2. लक्षात ठेवा की त्यांना घरातील जड काम देऊ नये. जर त्यांनी स्वतःच जड काम करायचे ठरवले असेल तर त्यांना थांबवा. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  3. वडिलधाऱ्या व्यक्तींसह काही वेळ एकत्र बसून बोलल्यावर मोठ्यांचे मन हलके होते. यामुळे आता त्यांच्यासाठी कोणालाच वेळ नाही हे त्यांच्या मनाला खटकत नाही.

4. लहान मुलांना घरातील मोठ्यांचा आदर करायला शिकवा. त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच अशा सवयी लावा की त्यांनी दिवसातून किमान अर्धा तास त्यांच्या आजी-आजोबांसोबत घालवावा किंवा त्यांच्यासोबत काही उपक्रम करावेत. वृत्तपत्र वाचल्यानंतर मुलेही ते वाचू शकतात.

5. आरोग्याची काळजी घेण्यासाठी वडिलधाऱ्या व्यक्तींनी त्यांची औषधे योग्य वेळी घेतली की नाही याची खात्री करावी. यासोबतच त्यांना त्यांच्या उपचारासाठी किंवा तपासणीसाठी घेऊन जावे.

  • या दिनाची थीम काय आहे?

दरवर्षी या दिवसासाठी खास थीम ठरवली जाते. या वर्षीची थीम "Closing the Circle: Addressing Gender-Based Violence (GBV) in Older Age Policy, Law and Evidence-based Responses" आहे.

  • हा दिवस का साजरा केला जातो?

जगातील प्रत्येक सहा वडिलधाऱ्या व्यक्तींमागे एकावर अत्याचार होतो, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीनुसार भविष्यात ही प्रकरणे कमी होण्याऐवजी वाढू शकतात.

कारण लोकांनी अशी जीवनशैली निवडली आहे. ज्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप त्यांना त्रास देऊ शकतो. अशावेळी वृद्धांना शारीरिक, मानसिक आणि वैयक्तिक हिंसाचाराला सामोरे जावे लागू शकते.

वृद्धांशी चांगली वागणूक, त्यांच्या आरोग्याबाबत दक्षता, आर्थिक स्थिती मजबूत करणे, सामाजिक मार्गाने मदत करणे आणि वृद्धांच्या इतर अनेक समस्यांकडे लक्ष वेधणे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT