Mint Paneer Cheese Bites: नाश्त्यात पनीरपासून ट्राय 'हा' नवा पदार्थ

मिंट पनीर चीज बाइट्सचा सकाळच्या नाश्तात किंवा संध्याकाळचा नाश्तात आस्वाद घेउ शकता.
Mint Paneer Cheese Bites Recipe
Mint Paneer Cheese Bites RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Mint Paneer Cheese Bites Recipe: पनीर आवडणारे खूप लोक आहेत. पण नेहमीच्या पनीरच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. अनेकांना पनीरच्या वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायची असते.

तुम्हीही अशा खास डिशच्या शोधात असाल तर मिंट पनीर चीज बाइट्सची रेसिपी करून पाहू शकता. मिंट पनीर चीज बाइट्सची रेसिपी खूप सोपी आहे आणि त्याची चव अप्रतिम आहे. स्वादिष्ट मिंट पनीर चीज बाइट्स सकाळचा नाश्ता (Breakfast) किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून सर्व्ह केले जाऊ शकतो.

  • मिंट पनीर चीज बाइट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

300 ग्रॅम किसलेले पनीर

1/2 कप किसलेले चीज

20-15 ताजी पुदिन्याची पाने

1/2 कप तांदळाचे पीठ

1/2 कप बारीक चिरलेला कांदा

1/2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

1/2 टीस्पून काळी मिरी पावडर

1 टीस्पून चिली फ्लेक्स घ्या

1/2 चमचे ताजी चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी गरजेनुसार तेल

Mint Paneer Cheese Bites Recipe
How to Control Emotions: स्वत:च्या भावना 'अशा' करा कंट्रोल
  • मिंट पनीर चीज बाइट्स बनवण्याची कृती

सर्वात पहिले किसलेले पनीर एका मोठ्या भांड्यात घ्यावे.

नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, मीठ, चिली फ्लेक्स मिक्स करावे.

नंतर त्यात चीज घालावे आणि त्यात हिरवी धणे आणि पुदिन्याची पाने मिक्स करावे.

नंतर या मिश्रणात तांदळाचे पीठ चांगले मिक्स करावे.

आता हे सर्व पदार्थ नीट मॅश करावे आणि एकत्र करुन पीठ तयार करावे.

नंतर या पिठाचा मोठा गोळा घेऊन तो लांब रोल करून घ्या.

नंतर त्याचे छोटे तुकडे करावे आणि हाताने गोल आकार देऊन बाइट्स तयार करावे.

नंतर एका कढईत तेल घेऊन ते गरम करून मध्यम आचेवर तळून घ्यावे.

तुमचे मिंट पनीर चीज बाइट्स तयार आहेत.

तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत आस्वाद घेउ शकता.

  • या लोकांनी पनीरचे सेवन टाळावे

अतिसाराची समस्या

पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. पण जर हे प्रोटीन शरीरात जास्त असेल तर झिंकची समस्या उद्भवू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला आधीच डायरियाची समस्या असेल तर तुम्ही पनीर खाणे टाळावे.

रक्तदाब

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू नये. कारण रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पनीरचे सेवन चांगले मानले जात नाही. कारण याचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो.

ऍलर्जी

जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर थोडे सावधगिरीने सेवन करा. कारण पनीरचे सेवन केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

हृदयरोग

कॉटेज पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पनीरचे जास्त सेवन केल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते.

पचनाच्या समस्या

जर तुम्हाला पचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर झोपताना पनीरचे सेवन करू नका. दुसरीकडे, पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी पनीरचे सेवन टाळावे, अन्यथा तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com