World Consumer Rights Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Consumer Rights Day: ग्राहक म्हणून जाणून घ्या तुमचे अधिकार कोणते?

दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

World Consumer Right Day 2023: दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. एक ग्राहक म्हणून कोणकोणते अधिकार आहेत, एखाद्या प्रसंगी तक्रार कुठे आणि कशी करायची याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.

जागो ग्राहक’ या योजनेद्रारे या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. यंदाच्या वर्षी हा दिवस स्वच्छ उर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे संरक्षण या संकल्पनेवर आधारित आहे.

  • ग्राहकांचे मूलभूत हक्क

माहितीचा हक्क 

एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.

निवडीचा हक्क

वस्तूंची खरेदी (Shopping) करताना आपल्याला हवी असलेलीच वस्तू निवडून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. कारण आज अटीतटीच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकाला एकाच वस्तूचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

त्यामुळे त्याच्या निवडीलाही स्वातंत्र्य आहेच, पण एखाद्या विक्रेत्याने संबंधित ब्रँड्सच्याच वस्तू खरेदीचा दबाव टाकल्यास हे ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन आहे.

सुरक्षितेचा हक्क  

ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे बंधनकारक आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात.

मत मांडण्याचा हक्क

एखाद्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली असे वाटत असेल तर त्यासंदर्भात तक्रार निवारण मंच आणि ग्राहक हक्क न्यायालयात दाद मागण्याचा हक्क सरकारने ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो.

ग्राहक शिक्षण अधिकार

ग्राहकांचे हक्क जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर शिबीरे अथवा कार्यशाळा राबवत असते.

जागतिक ग्राहक हक्क दिवसाचा इतिहास 

जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी 15 मार्च 1962 रोजी युएस कॉंगेसला एक विशेष संदेश पाठवण्यात आला होता.

यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या हक्कांचे मुद्दे ठळकपणे मांडले. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते. त्यानंतर ग्राहक चळवळीने 1983 मधली तारीख ठरवली. त्यानंतर 15 मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT