World Art Day 2022
World Art Day 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'World Art Day' दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया

दैनिक गोमन्तक

कला दिन हा दरवर्षी 15 एप्रिल रोजी साजरा केला आहे. कला हे नेहमीच भावनांच्या अभिव्यक्तीचे आणि अन्वेषणाचे एक शक्तिशाली माध्यम राहिले आहे. तसेच या दिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्यांमध्ये विविध कलांची जागृती करण्यासाठी हा दियावस साजरा केला जातो. 15 एप्रिल 2012 रोजी प्रथमच जागतिक कला दिन म्हणून करण्यात आला. दरवर्षी जगभरातील विविध कलांशी संबंधित लोक हा दिवस 'कला दिवस' (World Art Day) म्हणून साजरा करतात आणि कला आणि कलाकारांबद्दल आदर व्यक्त करतात.

या दिवशी, आंतरराष्ट्रीय कला संघटना आणि UNESCO जगातील विविध कलांची जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे अनेक कार्यक्रम आयोजित करतात.

* 15 एप्रिल लाच का साजरा केला जातो?
महान इटालियन चित्रकार 'लिओनार्डो दा विंची'ची 15 एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाते. लिओनार्डो दा विंची हे इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, संगीतकार, कुशल यांत्रिक अभियंता आणि शास्त्रज्ञ होते. कलेतील प्रवीणतेमुळे त्यांना जगभरात मानसन्मान मिळाला आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त 'जागतिक कला दिन' साजरा केला जातो.

काय आहे ध्येय
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) नुसार, जागतिक कला दिनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजात कलात्मक अभिव्यक्तींना एकत्रित करणे आहे. तसेच समाजामध्ये कलेचे महत्त्व आणि योगदान काय आहे हे पटवून देणे आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्टने 2017 मध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी मान्यता दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Goa Today's Live News: कुर्टी-फोंड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, नऊ लाखांचे नुकसान

चांदीने मे महिन्यात केला मोठा रेकॉर्ड, गुंतवणूकदार ‘मालामाल’; सेन्सेक्स, सोने अन् बिटकॉइनलाही सोडले मागे

Valpoi News : वाळपईतील सरकारी विद्यालयाचा ८४ टक्के निकाल

SCROLL FOR NEXT