Women need to get these '5' vitamins for good health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

निरोगी आरोग्यासाठी महिलांना 'ही' 5 जीवनसत्वे मिळणे आवश्यक

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) आणि पोषक तत्वांची कमतरता अधिक असते

दैनिक गोमन्तक

वाढत्या वयाबरोबर स्त्रियांनी (Women) त्यांच्या आरोग्याची (Health) काळजी घेणे आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) आणि पोषक तत्वांची कमतरता अधिक असते. याचे मुख्य कारण हार्मोन्समधील बदल, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती असू शकते. बऱ्याच वेळा जीवनशैलीतील बदलांमुळे, स्त्रीयामध्ये अकाली वृद्धत्व सुरू होते. त्वचा(Skin), केस (Hair) आणि हाडांशी संबंधित समस्या स्त्रियामध्ये अधिक असते. यामुळे त्यांना पाय दुखी आणि पोट दुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रियांना निरोगी राहण्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वांची गरज असते हे आज जाणून घेवूया.

* स्त्रियांसाठी ही आहेत आवश्यक जीवनसत्त्वे

*व्हिटॅमिन डी

वाढत्या वयाबरोबर स्त्रियांनी हाडांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. पाठदुखी, गुडघे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा मुबलक पुरवठा असणे आवश्यक असते. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न समाविष्ट करण्याची गरज आहे. मशरूम, दूध, चीज, सोया, अंडी, लोणी, मांसाहार यासारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम समृद्ध असतात.

* व्हिटॅमिन ई

फिटनेसबरोबरच महिलांना त्यांच्या सौंदर्याचीही काळजी घ्यावी लागते. प्रत्येक स्त्री दीर्घकाळ तरुण आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आवश्यक आहे. आपली त्वचा, केस आणि नखे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई देखील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी मदत करते. बदाम, शेंगदाणे, लोणी आणि पालक सारखे पदार्थ व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध असतात.

* व्हिटॅमिन बी 9

गर्भधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान शरीराला अधिक जीवनसत्वे आवश्यक असतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाच्या जन्मादरम्यान अनेक समस्या उद्भवू शकतात. गर्भधारणे दरम्यान, स्त्रियानी बिन्स, धान्य, यीस्ट इत्यादि पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामुळे स्व:ताचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते.

* व्हिटॅमिन ए

स्त्रियांमध्ये 40 ते 45 वयानंतर हार्मोनल बदल होतात. या वयात महिलाना मेनोपॉजसह अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे त्वचेत अनेक बदल होतात. यामुळे स्त्रियांनी गाजर, पपई, भोपळ्याच्या बिया आणि पालक यासारख्या व्हिटॅमिन ए ने समृद्ध असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

* व्हिटॅमिन बी 12

अनेक स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवते. हृदय निरोगी ठेवण्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 महत्वाची भूमिका बाजवते. यामुळे आपल्या आहारात अंडी, दूध, चीज, चिकन, मासे यांचा समावेश करावा. कारण या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT