Vaginal Health Issues Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vaginal Health Issues: महिलांनी 'Vagina' शी संबंधित 'या' 5 समस्यांकडे दुर्लक्ष करू नये

महिलांनी धावपळीच्या काळात स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

महिलांनी आरोग्यासह शरीराची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी योनीच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण त्याच्याशी संबंधित छोटी दिसणारी समस्या देखील गंभीर समस्येचे रूप धारण करू शकते. योनीमार्गात कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधवा.

अनेक वेळा महिला संबंधित समस्यांमुळे तणाव आणि चिंताग्रस्त असतात. हे टाळण्यासाठी योनीच्या विविध समस्यांबद्दल तुम्हाला सतर्क राहावे लागेल आणि लक्षणे वेळीच ओळखावी लागतील. योनीमार्गाच्या आरोग्यासाठी (Health) कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या परिस्थितीत डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे हे जाणून घेउया.

  • योनीचा वास

योनीमार्गाची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. काही वेळा अस्वच्छतेमुळे त्यात दुर्गंधी येऊ शकते. स्वच्छता ठेउनही दुर्गंधीची समस्या कायम राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. योनिमार्गाची स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरू शकता.

  • योनीतून जळजळ

जर तुम्हाला योनीमध्ये जास्त खाज, जळजळ जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण इन्फेक्शनमुळे खाज आणि जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.

  • व्हल्व्होव्हागिनिटिस

योनिमार्गाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे व्हल्व्होव्हॅजिनायटिसची समस्या उद्भवु शकते. वेगवेगळ्या वयोगटातील मुली आणि महिला (Women) या समस्येने त्रस्त आहेत. व्हल्व्होव्हाजिनायटिस हा मुख्यतः विष्ठेच्या जंतूंच्या योनीमध्ये प्रवेश केल्यामुळे होतो. त्याच्या लक्षणांमध्ये अस्वस्थता, खाज सुटणे आणि योनीतून अनियमित स्त्राव यांचा समावेश होतो

Vaginal Health Issues:
  • योनीमध्ये आग होणे

योनीमध्ये कधीकधी जळजळ होणे सामान्य आहे. परंतु बहुतेक महिलांना याचा त्रास नेहमी होतो. हे कधीकधी डिहायड्रेशनमुळे देखील होते. जिवाणू संसर्ग, यीस्ट संसर्ग, मूत्रमार्गात संक्रमन सारख्या परिस्थितीमुळे देखील होऊ शकते. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • गुणवत्ता आणि रंगात बदल

योनीमार्गामधुन जर तुमचा स्त्राव पांढरा किंवा पांढरा रंग असेल तर ते सामान्य आहे. परंतु जर स्त्रावाचा रंग गडद पिवळा, हिरवा किंवा तपकिरी असेल तर ते गंभीर त्रासाचे लक्षण असू शकते. असे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Viral Video: सीटवरुन 'महाभारत'! बसमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'बायकांनी नवऱ्याचा राग...'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT