Women Health Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Health Care: वाढत्या वयानुसार महिलांना वजन कमी करणे कठीण का होते? वाचा सविस्तर

वाढत्या वयाबरोबर वजन कमी करणे खुप कठीण होऊन बसते. ही समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते.

Puja Bonkile

Women Health Care: अनेक महिला वजन कमी करण्यासाठी खुप प्रयत्न करतात. पण तुम्ही कधी विचार केला का का की महिलांना वाढत्या वयानुसार वजन कमी करणे इतके अवघड का होते? आपल्या शरीरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. वजन कमी करणे कधीकधी खूप कठीण असते. जसजसे तुमचे वय वाढते तसतसे तुमचे शरीरात अनेक बदल होतात. वजन कमी न होण्यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊया.

पचनक्रिया मंदावते

वयानुसार तुमची पचनक्रिया मंदावणे सामान्य आहे. वयाच्या तीशीनंतर, चयापचय हळूहळू कमी होऊ लागते. जर तुमच्या खाण्याच्या सवयी बरोबर नसतील आणि तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर त्यामुळे वजन वाढू शकते.

पुरेसी झोप

तुमचे वय जसजसे वाढते तसतसे रात्री झोपणे खूप कठीण होते. हे वाढत्या वयामुळे होते. अनेक लोकांना झोप येत नाही. पुरेशी झोप न घेतल्याने देखील वजन वाढू लागते.

स्नायूंची झीज

वाढत्या वयाबरोबर स्नायूंची झीज होते.त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. यामुळे तुम्ही जिम किंवा व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे. आठवड्यातून तीन वेळा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करा. तसेच नियमितपणे व्यायम देखील करावा.

हार्मोनल बदल

महिलांच्या आयुष्यात अनेक टप्पे असतात ज्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि नंतर रजोनिवृत्ती यांचा समावेश होतो. रजोनिवृत्ती हा एक नैसर्गिक जैविक टप्पा आहे. यामुळे महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते ज्यामुळे वजन वाढू लागते.

वाईट लाइफस्टाइल

जसजसे वय वाढते तसतशी तुमची लाइफस्टाइल देखील कमी अॅक्टिव होऊ लागते. वयामुळे तुमची एनर्जी लेव्हलही कमी होते. याचे कारण दिवसभर काम करणे किंवा तुमची खराब लाइफस्टाइल असू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सतत कामात असले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT