सध्या चुकीची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार वाढत चालले आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की प्लास्टिक, नॉनस्टिक भांडे आणि हेअर डाय सारख्या वस्तुंमध्ये असलेल्या पीएफएएस आणि बीपीए केमिकलमुळे महिलांमध्ये स्तन,गर्भाशय आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढला आहे. पीएफएएस हे घटक कधीच नष्ट होत नाही. याचा वापर वॉटपफ्रुफ कपडे, फूड पॅकेजिंगमध्ये केला जातो. जनर्ल ऑफ एक्सपोज सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कर्करोगाने पिडित महिलांच्या शरीरात या केमिकलचे प्रमाण अधिक आढळले आहे. या अभ्यासावरून हे स्पष्ट झाले की कर्करोगाचा धोका या केमिकलमुळे अधिक वाढला आहे.
संशोधनात काय सांगितले आहे
दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यालयाच्या केके स्कुल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी १०,००० हून अधिक महिलांच्या ब्लड आणि युरिनच्या मनुम्यांचे विश्लेषण केले. यावरून पीएफएनए केमिकल आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंध असल्याचे दिसून आले. संशोधनानुसार प्लास्टिक, रंग आणि सांडपाण्यामध्ये आढळणाऱ्या फिनॉल केमिकलच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यका अधिक असते.
म्हणून महिलांमध्ये कर्करोगाचा धोका अधिक
दुस-या एका संशोधनानुसार जगातील महिला पांढरे केस लपवण्यासाठी किंवा त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हेअर डाय करतात. यामुळे देखील महिलांमध्ये कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. एका आकडेवारीनुसार असे समोर आले की अनेक देशांमध्ये 80 टक्के महिला हेअर डायचा वापर करतात तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 10 टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते हेअर डाय करताना डोक्याच्या त्वचेला लागू देऊ नका. तसेच हेअर डाय सुकल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.