Women Bike Riders: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Bike Riders: गोव्यातील सोशल मीडियावरची इन्फ्लूएन्सर बनली महिला बाईक रायडर्स

Women Bike Riders: वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या चार महिला दिल्ली ते लेह हा प्रवास मोटरसायकलवरुन करताहेत हे एका अलीकडील चित्रपटातून दाखवले गेले होते.

दैनिक गोमन्तक

Women Bike Riders:

किंबर्ली कुलासो

वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या चार महिला दिल्ली ते लेह हा प्रवास मोटरसायकलवरुन करताहेत हे एका अलीकडील चित्रपटातून दाखवले गेले होते. मोटरसायकल चालवण्याची त्यांची आवड आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद, त्यांची स्वातंत्र्याची भावना हे त्यात प्रकर्षाने प्रतित होत होते. मुळातच हे क्षेत्र पुरुषप्रधान आहे.

अनेक पुरुषप्रधान क्षेत्रातील अडथळे मोडून काढत आजच्या स्त्रिया समाजाच्या तकलादू अपेक्षांना आव्हान देत आहेत. मोटरसायकल सफारी हा त्यापैकी एक आहे. मोटरसायकल सफरीचा रोमांच स्वतंत्रपणे अनुभवणाऱ्या महिला गोव्यातही आहेत. अर्थात, अशी सफर करताना पुरुष मोटरसायकलस्वाराइतकाच मोकळेपणा त्या अनुभवू शकतात काय?

सोशल मीडियावरची इन्फ्लूएन्सर फ्‍लोक्सिया डिसौझा हिला पूर्वीपासून स्वतःची मोटरसायकल हवी होती. एका वर्षापूर्वी तिने रॉयल एन्फिल्डच्या शोरुममध्ये कागदांवर स्वाक्षरी  केली आणि तिचे स्वप्न पूर्ण झाले.

तेव्हापासून आपल्या हंटर-350 वरून ती दिमाखाने हिंडत असते. ती म्हणते, ‘मी पश्‍चिम घाटातून मोटारसायकलवरून फिरले आहे पण अजून अतिशीतल हवामानात किंवा चकवे देणाऱ्या रस्त्यांवरून मी मोटरसायकल चालवलेली नाही.’ नजीकच्या काळात हिमालयात मोटरसायकल चालवण्याचे स्वप्न फ्‍लोक्सिया पाहते आहे.

फ्‍लोक्सिया डिसौझा

फ्‍लोक्सिया प्रवासाच्या नियोजनावर भर देणे पसंत करते आणि आपल्या अंतःप्रेरणांवर विश्‍वास ठेवते. ती म्हणते, ‘निर्जन ठिकाणी किंवा ढाब्यावर थांबणे मी टाळते. व्यवस्थित शौचालय असलेली जागा शाेधण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे स्थान मी गुगल मॅपवर शेअर करत राहते, जेणेकरून माझे मित्र माझा मागोवा घेऊ शकतात. विशेषतः, जेव्हा मी एकट्याने प्रवास करत असते तेव्हा मी असेच करते. दिवसभर मोटरसायकल चालवून सूर्यास्ताच्या पूर्वी मी माझ्या इच्छित स्थळी पोहचेन हे मी सुनिश्‍चित केलेले असते.’

सलमा बानू

मडगांवची सलमा बानू आपल्या रॉयल एन्फिल्ड हिमालयनवरून सफर करते. येत्या मे महिन्यात गोवा ते मुंबई व नंतर काश्‍मिरपर्यंत जाण्याची तिची योजना आहे. पण मोटारसायकल सफारी दरम्यान असणाऱ्या सुरक्षिततेबद्दल तिच्या मनात शंका आहेत. ती म्हणते, ‘अलीकडे स्पॅनिश बाईला तिच्या मोटरसायकल सफारीच्या दरम्यान जो वाईट अनुभव आला त्यासारखे मी काही अजूनतरी सुदैवाने अनुभवलेले नाही पण अनेक वेळी पुरुष अतिमित्रत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात, विशेषतः, जेव्हा मी पाण्यासाठी किंवा खायला थांबलेले असते तेव्हा. ते मला फार विचित्र वाटते.’ अर्थातच सलमा आपल्या प्रवासात सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेते. तिला ठाऊक आहे की आणिबाणी कुठल्याही वेळी उद््भवू शकते. तिच्यासाठी गंतव्य स्थळ सर्वात महत्त्वाचे असते.

आरती गेडम

आरती गेडम पणजीला राहते. आपल्या जावा मोटरसायकलवरुन ती हल्लीच सिंधुदुर्ग आणि पुण्याला जाऊन आली आहे. ती प्रवासात आपल्याबरोबर सुरक्षिततेची साधने घेऊन जाते. ती म्हणते, ‘एक महिला रायडर असणे हे अर्थातच अवघड असते पण तुमच्यापाशी जर आत्मविश्‍वास असेल तर तुम्ही नक्कीच निभावून नेऊ शकता. अर्थात नियोजन हे फार महत्वाचे असते.’

आरती आपल्या प्रवासाचा मार्ग योग्यरित्या आखते. ती निर्जन स्थळी कधीच थांबत नाही आणि थांबायचे झाल्यास बाजारासारख्या सार्वजनिक ठिकाणी थांबणे ती पसंत करते. पेपर स्प्रे आणि छोटी लाेखंडी सळी ती प्रवासात कायम बरोबर बाळगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT