Bhandari Community In Goa: गोव्यातील भंडारी समाजात फूट, बेकायदा कारभाराचा आरोप

Bhandari Community: तालुकावार समित्या: बेकायदा कारभाराचा अशोक नाईकांवर आरोप
Bhandari Community
Bhandari CommunityDainik Gomantak
Published on
Updated on

Bhandari Community In Goa

राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजात फूट पडल्यातच जमा झाली आहे. गोमंतक भंडारी समाज या संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक हे मुदत संपूनही संघटनेची निवडणूक घेत नाहीत, आमसभा बोलावत नाहीत, असा आरोप करणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी आता तालुकावार समित्यांची निवड करणे सुरू केले आहे.

पेडणे तालुक्याची समिती नेमून त्यांनी तालुकावार समांतर समित्यांची निवड करणे सुरू केले आहे. भंडारी समाजाच्या सरचिटणीसपदी निवडून येऊनही पदाचा ताबा न घेतलेल्या उपेंद्र गावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्याच नेतृत्वाखाली पर्वरी येथे एक बैठक घेण्यात आली होती. त्यात संजीव नाईक, हनुमंत नाईक, गोरखनाथ केरकर, संदीप वेर्णेकर, शिवदास माडकर, सुनील सांतिनेजकर, विनोद मेथर, काशिनाथ मयेकर,

Bhandari Community
Cashew In Goa: काजूला हमी भाव मिळण्यास ‘कृषी कार्ड’चा अडसर..!

वेंकटराय नाईक, काशिनाथ मयेकर, प्रवीण भंडारी, प्रभाकर मांद्रेकर, सुदेश किनळेकर, अमृत आगरवाडेकर, अविनाश शिरोडकर, उमेश तळवणेकर आणि म्हाळू नाईक त्यात सहभागी झाले होते.

त्या बैठकीतच राज्यभरातील समाज बांधवांत जागृती करून हा विषय पोचवण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानंतर तालुकावार, गाववार बैठका घेणे सुरू करण्यात आले होते.

Bhandari Community
CM Pramod Sawant: सावली झुगारली, मेहनतीने उमटवला ठसा!

आमच्या समितीची मुदत नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. यापूर्वी अनिल होबळे यांच्या समितीला २०१५ ते २०१८ अशी मुदतवाढ आमसभेने दिली होती. कोविड असल्याने आम्ही ऑनलाइन आमसभा घेतली होती. ज्यांना कायदेशीर कारवाई करायची असेल ते तशी कारवाई करण्यासाठी मोकळे आहेत. आमसभेने समितीला मुदतवाढ दिली असे आमचे म्हणणे आहे. समाजात असे गट निर्माण होणे हे नवीन नाही. आता तीन वर्षांनी त्यांना अचानक जाग का आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

- अशोक नाईक, भंडारी समाज अध्यक्ष

अशोक नाईक यांना १ एप्रिलपर्यंत पायउतार होण्यासाठी वेळ दिला आहे. पक्षाच्या घटनेत किंवा उपनियमांत कार्यकारिणीला ऑनलाइन मुदतवाढ देण्याची तरतूद नाही. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी निवडणूक झाली होती. त्या समितीची मुदत २५ मे २०२१ रोजी संपली आहे. अशोक नाईक बेकायदेशीरपणे पदावर आहेत. याविषयी कायदेशीर कारवाई करावी की अन्य मार्ग चोखाळावा याचा निर्णय भंडारी समाज बांधव १ एप्रिलनंतर बैठक घेऊन घेतील. अशोक नाईक यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या कथित ऑनलाइन आमसभेला केवळ ७ जणच उपस्थित होते हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

- उपेंद्र गावकर, भंडारी नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com