Winter Skin Care Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care Tips: त्वचा कोरडी पडतेय, ओठ फुटतायत, पायाला भेगा पडतायत; वेळीच 'हे' उपाय करणं महत्वाचं

Winter Skin Care Tips: वाढत्या थंडीवर काही घरगुती उपाय शोधात असाल तर आज यावर काही साधे आणि सोपे मार्ग जाणून घ्या

Akshata Chhatre

Winter Skin Care Routine

हिवाळ्याचा महिना सुरु झाला आहे, हळूहळू हवेतला गारवा वाढायला सुरुवात झाली आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर देखील दिसून येऊ लागला आहे. सर्दीच्या काळात त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते, ओठ फुटतात, पायाला भेगा पडतात आणि एकूणच चेहरा तसेच हात आणि पाय देखील रुक्ष व्हायला सुरुवात होते. तुम्ही या सततच्या त्रासाला कंटाळला आहात ना? पण यावर काही उपाय केलेत की नाही? केले नसतील आणि काही घरगुती उपाय शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला थंडीपासून वाचण्याचे काही साधे आणि सोपे मार्ग सुचवणार आहोत.

त्वचेचे आजार आहेत का?

सर्दीच्या काळात शरीराला हवी तेवढी तहान लागत नाही आणि म्हणूनच आपल्याकडून पाणी पिणं कमी होतं, पण हे लक्षण बरोबर नाही हे लक्ष्यात घ्या. शिवाय बाहेर भरपूर गारवा आहे असं म्हणून आपण सकाळी सकाळी बाहेर पडणं टाळतो, परिणामी सकाळची सूर्यकिरणं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.

सकाळच्या सूर्यकृरणांमध्ये व्हिटॅमिन-D असतं, यामुळे त्वचेचे विकार आपोआप कमी व्हायला मदत मिळते. तुम्हाला जर का त्वचेचे आजार असतील तर आता सर्दीच्या काळात भरपूर पाणी प्या, सकाळी सकाळी सूर्यकिरणं अंगावर घ्या, तसंच ज्या कपड्यांमुळे रॅशेस होण्याची शक्यता वाटते असे कपडे घालणं टाळा.

चेहऱ्याचा ग्लो कसा वाढवाल?

सर्दीच्या दिवसांत त्वचेचा वरचा थर फाटतो आणि म्हणून आपल्याला त्वचा रुक्ष झाल्यासारखी वाटते. सर्दीच्या काळात लहानमुलांना तसेच वरिष्ठांना देखील हा त्रास होऊ शकतो म्हणूनच किमान दिवसातून दोनवेळा त्वचेला मॉइश्च्युराईजर लावा, पुन्हापुन्हा हात-पाय धुवू नका, साबणाचा वापर कमी करा, जे कपडे तुम्हाला उष्णता प्रदान करतील अशा कपड्यांचा वापर करा, भरपूर पाणी प्या आणि व्हिटॅमिन-D अधिकाधिक प्रमाणात शरीराला मिळेल याची काळजी घ्या.

अधिक गरम पाण्याची अंघोळ करताय?

बाहेरचा गारवा कमी व्हावा म्हणून दररोज गरम पाण्याने आंघोळ करताय का? हो तर त्वरित हे थांबवा. यामुळे शरीरातील रुक्षता वाढू शकते किंवा अंगाला खाज सुटू शकते. मग काय गार पाण्याने अंघोळ करावी? नाही मुळीच नाही सर्दीमधे आंघोळ करताना सर्वात आधी पायांवर पाणी घ्या, यावेळी अधिक गरज पाण्याचा वापर करू नका कारण जास्ती गरम पाणी शरीरातील मॉइश्च्युराईग कमी करू शकतं. दिवसातून केवळ एकाच वेळी आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर मॉइश्च्युराईझरचा वापर करा आणि आठवड्यातून किमान एकदा तेलाचा मसाज करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT