Winter Cloths Care Tips: स्वेटर, टोपी यासारखे उबदार कपडे वर्षानुवर्ष दिसतील नवे; 'असे' करा स्टोअर

How To Store Winter Clothes | हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीच्या कपड्याचा वापर केला जातो. पण हे कपडे नव्यासारखे राहण्यासाठी कसे स्टोअर करावे हे जाणून घेऊया.
Winter Cloths Care Tips: Know How To Store Winter Clothes
Winter Cloths Care Tips: Know How To Store Winter ClothesDainik Gomantak
Published on
Updated on

Winter Cloths Care Tips

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीच्या कपड्याचा वापर केला जातो. पण लोकरीच्या कपड्यांची काळजी घेतली नाही तर ते खराब होतात. लोकरीचे कपडे नाजूक असतात यामुळे त्या कपड्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही हॅक्स ट्राय केल्यास उबदार कपडे नव्यासारखे चमकतील.

Winter Cloths Care Tips: Know How To Store Winter Clothes
Frizzy Hair Care Tips: केसांचा फ्रेझीनेस कमी करायाचा असेल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात
  • लोकरीचे कपडे उन्हात वाळवावे

हिवाळ्यानंतर लोकरीचे कपडे ठेवण्यापूर्वी ते चांगले धुवावे आणि ऊन्हात वाळवा. यामुळे त्यांच्यामध्ये असलेले बॅक्टेरिया निघून जातात. लोकरीचे कपडे बराच वेळ सूर्यप्रकाशातही ठेवू नका. यामुळे त्यांचा रंग खराब होऊ शकतो. याशिवाय लोकरीचे कपडे पिळून कधीच वाळवू नका. त्यामुळे कपड्यांचा रंगही फिका पडतो.

  • अशा प्रकारे करा स्टोअर

हिवाळा संपताच भहदार कपडे धुवा आणि स्वच्छ जागेवर ठेवावे. तुम्ही कपाटात कडुलिंबाची काही पाने ठेवू शकता किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवू शकता. यामुळे कपड्यांमध्ये ओलावा राहणार नाही.

  • उबदार कपड्यांची काळजी कशी घ्यावी

जर तुमच्या कपड्यावर "केवळ ड्राय क्लीन" असा टॅग असेल तर पाण्यात धुवू नका. यामुळे कपडे खराब होऊ शकतात.

Winter Cloths Care Tips: Know How To Store Winter Clothes
Parenting Tips: मुलांशी बोलताना पालकांनी 'या' चुका करू नये, अन्यथा...
  • लहान मुलांचे आणि मोठ्यांचे कपडे वेगळे ठेवावे

लहान मुले आणि वडीलधारी व्यक्तींचे कपडे वेगळे ठेवावे. घरातील वडीलधारी व लहान मुलांचे लोकरीचे कपडे वेगळे ठेवावे. कारण गरज असताना सर्व कपडे शोधावे लागणार नाही. तुम्हाला हवे ते कपडे तुम्ही सहज काढू शकता.

  • लाकडी कपाट

लोकरीचे कपडे कधीही लाकडी कपाटात ठेवू नका.कारण ते खराब होण्याची जास्त शक्यता असते.

  • स्प्रेस करू नका

लोकरीचे कपडे कधीही इस्त्री करू नका. हे कपडे स्प्रेस करण्याची गरज नसते. हे कपडे अतिशय नाजूक असतात. हे स्प्रेस केल्याने जळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com