Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care: हिवाळ्यात वाफ घेतल्यास चेहरा होईल चमकदार

हिवाळ्यात वाफ घेतल्याने अनेक फायदे होतात.

Puja Bonkile

Benefits Of Steam: बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. सर्दीमुळे नाक बंद होऊन खोकला सुरू होतो. अशा परिस्थितीत वाफ घेणे खूप फायदेशीर ठरते. 

चेहऱ्यावर वाफ घेतल्यास त्वेचतील घाण स्वच्छ होते. याशिवाय वाफेची उबदार आणि ओलसर हवा ब्रोन्कियल नलिकांना आराम देते. ज्यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. वाफेमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे घशातील सूजही कमी होते. 

थंडीच्या दिवसांमध्ये दररोज वाफ घेतल्याने श्वसन प्रणाली मजबूत होते. ज्यामुळे विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. याशिवाय वाफेमध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. त्यामुळे हिवाळ्यात वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. यासोबतच वाफेचे इतर कोणता फायदे आहेत हे जाणून घेऊया.

चेहऱ्यावर चमक

हिवाळ्यात वाफ घेणे खूप फायदेशीर असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. वाफ घेतल्याने त्वचेला आर्द्रता मिळते आणि ती मऊ आणि चमकदार बनते. 

छिद्र देखील वाफेने स्वच्छ केले जातात. ज्यामुळे त्वचेवर साचलेली घाण आणि तेल व्यतिरिक्त, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स देखील दूर होतात. याशिवाय वाफेमुळे रक्ताभिसरणही वाढते ज्यामुळे त्वचेला चमक येते. नियमितपणे वाफ घेतल्याने त्वचा चमकदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. 

वाफ कशी घ्यावी


चेहऱ्यावर थेट वाफ घेणे टाळावे. वाफ घेतांना चेहऱ्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्यावी. स्टीम घेतल्यानंतर चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावावे. स्टीम घेताना डोळे मिटून वाफ हळूहळू आत घ्यावी. अशा प्रकारे वाफ घेणे श्वास आणि चेहरा दोन्हीसाठी फायदेशीर आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT