Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: हिवाळ्यात झटपट दही कसे लावावे? वाचा एका क्लिकवर

हिवाळ्यात झटपट दही कसे लावावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Kitchen Hacks: हिवाळा असो की उन्हाळा दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुकानात लहान-मोठ्या पॅकमध्ये दही सहज उपलब्ध होत असले तरी, तरीही बहुतेक लोक घरी उरलेल्या दुधापासून दही तयार करणे चांगले मानतात.

पण हिवाळ्यात दही लावणे अवघड होते. जसजसे तापमान कमी होते तसतसे दही लागण्याची शक्यता कमी होते. अशा हवामानात दही पाण्यासारखे पातळ होते आणि त्याला विचित्र चव येते. यामुळे दही योग्य पद्धतीने लावण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • हिवाळ्यात दही का लागत नाही?

हिवाळ्यात कमी तापमानामुळे दही लागत नाही. उन्हाळ्यात सेट व्हायला फक्त 5-7 तास लागतात. पण हिवाळ्यात 12 तास लागतात.

दही लावण्याची सोपी पद्धत

सर्वात पहिले दूध उकळवा आणि एका भांड्यात घालावे. आता 1 चमचा दही घालून दुधात चांगले मिक्स करावे. आता एक हिरवी मिरची धुवून कोरडी करून दुधात टाकावी.

मिरचीचे देठ तोडू नका नाहीतर दही मसालेदार होईल. आता भांडे झाकणाने झाकून कपड्यात किंवा गरम पाण्यात ठेवून एका कोपऱ्यात ठेवावे. तुम्ही मिरचीऐवजी मेथीदाणा देखील वापरू शकता.

  • कॅसरोल वापरावे

हिवाळ्यात दही सेट करण्यासाठी कॅसरोल पद्धत सर्वोत्तम आहे. कारण कॅसरोल्स उष्णता टिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. अशावेळी दूध जास्त काळ गरम राहते. यामुळे लवकर दही तयार होण्यास मदत होते.

सर्वात पहिले दूध उकळून थोडे थंड होऊ द्यावे. आता 1-2 चमचे मिल्क पावडर घालून मिक्स करावे. नंतर 1 चमचा दही घालावे आणि दूध चांगले फेटून घ्यावे. आता कॅसरोलमध्ये दूध घाला आणि टॉवेलने गुंडाळा आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा.

  • या गोष्टी ठेवा लक्षात

तुमचे दही किती चांगले सेट होईल हे साधारणपणे दुधाचे तापमानावर अवलंबून असते. खूप थंड किंवा खूप गरम तापमान दह्याची सेटिंग प्रक्रिया खराब करू शकते.

दही लावतांना सर्वात पहिले दूध व्यवस्थित उकळून गॅस बंद करावे. उकळलेले दूध 20 टक्के थंड झाल्यावर दूध सेट होण्यासाठी तयार होते. एक चमचा दही दूधात टाकावे आणि झाकून ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT