थंडी सुरू झाल्याने सूर्यप्रकाशही कमी झाला आहे. यामुळे कपडे लवकर सुकत नाही. कपडे नीट न सुकल्याने दुर्गंधीची समस्या सुरू होते. या विचित्र वासांमुळे त्यांना परिधान करणे कठीण होते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण पुढील सिंपल टिप्स वापरून ही समस्या कमी करू शकता.
हिवाळ्यात ओल्या कपड्यांमधून येणारा हा वास दूर करण्याचे पुढील टिप्स फोलो करू शकता.
कपडे भिजवातांना काय करावे
हिवाळ्यात हवेत भरपूर आर्द्रता असते आणि त्यामुळेच ओले कपडे सहज सुकत नाही. अशावेळी कपड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता खूप जास्त असते.
कपड्यांना दुर्गंधी येणे सामान्य आहे. हिवाळ्यात बर्याचदा पाऊस पडतो, ज्यामुळे या जंतू आणि बुरशीपासून तुमचे कपडे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे घामाचे कपडे पंख्याखाली वाळवू शकता. थंड कपडे कधीही सोबत ठेवू नका.
हिवाळ्यात कपडे धुतल्यानंतर कपड्यांमध्ये डेटॉल टाकावे. कपडे पूर्णपणे हवेत कोरडे होईपर्यंत ते घालू नका.
असे सुकवावे कपडे
हिवाळ्यात सूर्यप्रकाश फार कमी असतो. यामुळे कपडे सुकवणे अवघड काम असते. त्याऐवजी घरातच सुकवावे. तुम्ही घराच्या आत किंवा बाल्कनीत तात्पुरते दोर लटकवू शकता. नाहीतर कपडे सुकवणारा स्टँड विकत घेऊ शकता. जर तुमच्याकडे बाल्कनी नसेल, तर कपडे खिडकीजवळ किंवा पंख्याखाली हवेत सुकवू शकता.
या गोष्टींचा करा वापर
कपडे फक्त हवेत सुकवले तरी त्यांचा वास येणार नाही.
तुम्ही डिटर्जंट्स वापरू शकता. यामुळे तुमचे कपडे निर्जंतुक होतात आणि सुगंधी देखील होतात. कपडे पाण्याने नीट धुतल्यानंतर त्यात लिंबू किंवा गुलाबाचा सुगंधित डिटर्जंट टाकू शकता. हे कपड्यांमध्ये ताजेपणा आणण्यासाठी मदत करतात.
कपडे धुताना थोडे लक्ष द्यावे. तुमचे कपडे निर्जंतुक करू शकणारे डिटर्जंट वापरा. डिटर्जंटमध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून कपडे धुवावे.
बुरशी दूर करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा उत्तम मार्ग आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.