Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy Vaccination: गर्भवती महिलेसाठी का महत्त्वाची आहे 'ही' लस? नवजात बाळाचेही होते संरक्षण; जाणून घ्या फायदे अन् तोटे

Tetanus Injection: गर्भधारणेदरम्यान आई आणि न जन्मलेल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या लसी दिल्या जातात. यापैकीच एक टिटॅनस लस आहे.

Manish Jadhav

गर्भधारणेदरम्यान आई आणि न जन्मलेल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या लसी दिल्या जातात. यापैकीच एक टिटॅनस लस आहे. ही लस आईलाच नाहीतर बाळालाही जीवघेण्या संसर्गांपासून वाचवते. परंतु काही प्रकरणांमध्ये महिलांना ही लस मिळत नाही. जी नंतर धोकादायक ठरु शकते. चला तर मग गर्भवती महिलांसाठी टिटॅनस लस का महत्त्वाची आहे आणि ती न दिल्यास कोणते धोके उद्भवू शकतात? तसेच, टिटॅनस म्हणजे काय ते जाणून घेऊया...

टिटॅनस हा क्लोस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा जीवाणू सामान्यतः माती, धूळ किंवा गंजलेल्या लोखंडात आढळतो. जेव्हा हा जीवाणू जखमेतून किंवा दुखापतीतून शरीरात प्रवेश करतो तेव्हा पायाला पेटके येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवतात. टिटॅनसचा संसर्ग आई आणि गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी अत्यंत धोकादायक आहे.

गरोदरपणात टिटॅनस लस का आवश्यक?

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील डॉ. सलोनी चड्ढा सांगतात, गर्भवती महिलेला टिटॅनसची लस दिल्याने तिच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, ज्या आई आणि गर्भाशयातील बाळाचे टिटॅनसपासून संरक्षण करतात. प्रसूतीदरम्यान किंवा नाळ कापताना स्वच्छतेची काळजी घेतली नाहीतर नवजात बाळाला टिटॅनसचा संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर आईला टिटॅनसची लस दिली गेली असेल, तर नवजात बाळाला टिटॅनसचा धोका कमी होतो.

टिटॅनसची लस न घेतल्यास काय नुकसान होऊ शकते?

डॉ. सलोनी यांच्या मते, जर टिटॅनसची लस दिली गेली नाहीतर, आई किंवा नवजात बाळाला प्रसूतीदरम्यान टिटॅनसचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवू शकतो, जो प्राणघातक देखील असू शकतो. या आजारात बाळाचे स्नायू कडक होऊ शकतात, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय, मृत्यू देखील होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) उघड्या जखमा, नाळ कापताना काळजी न घेणे किंवा स्वच्छतेचा अभाव यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

टिटॅनस लसीचे फायदे

कधीकधी टिटॅनस लसीसोबत घटसर्प आणि डांग्या खोकल्याची लस देखील दिली जाते, ज्यामुळे आई आणि बाळाचे या आजारांपासून संरक्षण होते. टिटॅनस लस घेतल्याने आईची प्रतिकारशक्ती मजबूत होते, जी इतर संसर्गांपासून देखील संरक्षण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT