
गर्भधारणा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील काळ असतो. या काळात आईच्या प्रत्येक सवयीचा, आहाराचा आणि दिनचर्येचा थेट परिणाम बाळाच्या विकासावर होतो. बऱ्याचदा महिला नकळत काही चुका करतात, ज्यामुळे गर्भाशयातील बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास बिघडू शकतो. अशा परिस्थितीत, गर्भधारणेदरम्यान सावधगिरी बाळगणे आणि या सामान्यपणे धोकादायक सवयी टाळणे गरजेचे ठरते. चला तर मग स्त्रीरोगतज्ज्ञांकडून अशा 5 मोठ्या चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्या गर्भधारणेदरम्यान बाळाचा विकास मंदावू शकतात.
सफदरजंग हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सलोनी चड्ढा सांगतात, गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) महिलेच्या शरीराला अतिरिक्त पोषणाची आवश्यकता असते, कारण ती केवळ स्वतःसाठीच नाहीतर गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी देखील जेवत असते. बऱ्याचदा स्त्रिया खाण्यापिण्याबाबत निष्काळजी होतात किंवा भूक नसताना आवश्यक पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बाळाला आवश्यक जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिड मिळत नाही, ज्यामुळे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो.
डॉ. सलोनी पुढे सांगतात, गर्भधारणेदरम्यान महिलांनी संतुलित आहार (Diet) घ्यावा, ज्यामध्ये हिरव्या भाज्या, फळे, दूध, डाळी, सुकामेवा आणि फॉलिक अॅसिड असलेल्या गोष्टींचा समावेश असावा. तसेच, वेळोवेळी डॉक्टरांकडून आहाराविषयी सल्ला घेत रहावा.
गरोदरपणात शरीराला जास्त विश्रांतीची आवश्यकता असते. जर आईला पुरेशी झोप मिळाली नाहीतर हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे आईमध्ये चिडचिड, थकवा आणि रक्तदाबासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरोदर महिलांनी दररोज किमान 8-9 तास झोप घ्यावी. तसेच, नियमित झोपेची वेळ ठरवून स्क्रीन टाइम कमी करावा.
सतत ताण किंवा चिंता आई आणि न जन्मलेल्या बाळासाठी हानिकारक असते. ताण शरीरात कॉर्टिसोल नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढवतो, जो बाळाच्या मेंदूच्या विकासात अडथळा आणू शकतो. ध्यान, हलके योगासने, चांगली पुस्तके वाचणे किंवा आवडते संगीत ऐकणे यामुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
जर एखादी महिला धूम्रपान करते किंवा मद्यपान करते तर त्याचा थेट परिणाम बाळावर होतो. यामुळे बाळाचे वजन कमी होऊ शकते, अकाली प्रसूती होऊ शकते किंवा कधीकधी गर्भपात देखील होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान ड्रग्जपासून पूर्णपणे दूर रहावे.
डॉ. सलोनी चड्ढा यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घेण्यासोबत लोह, कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिड सारखे आवश्यक पूरक आहार घेणे खूप महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास बाळाच्या अवयवांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. एवढचं नाहीतर जन्माच्या वेळी गुंतागुंत होऊ शकते. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि पूरक आहार वेळेवर घ्यावा. तसेच, दरमहा नियोजित तपासणी करुन घेण्यास अजिबात विसरु नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.