मार्केटमध्ये नेलपॉलिश वेगवेगळ्या किमतीत आणि गुणवत्तेत 5 रूपयापासून ते 5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. महिलांना लिपस्टिक आणि काजल लावण्याची जेवढी आवड असते, तेवढीच त्यांना त्यांच्या पायाच्या आणि बोटांच्या नखांना नेलपॉलिश लावण्याच्याही आवड असते. मार्केटमध्ये अनेक रंगात नेलपॉलिश उपलब्ध आहे. लोक त्यांच्या आवडीनुसार नेलपॉलिश खरेदी करतात.
नेलपॉलिशचे अनेक ब्रँड मार्केटमध्ये स्वस्त ते महागडे उपल्बध असतात. ज्यामध्ये सर्वांची गुणवत्ता आणि किंमत दोन्ही भिन्न असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नेलपॉलिश कितीही स्वस्त किंवा महाग असली तरी या सर्व प्रकारच्या नेलपॉलिश किंवा जेल काचेच्या बाटल्यांमध्ये का साठवले जाते? शेवटी प्लास्टिक, स्टील आणि लोखंडासह इतर धातूच्या बाटल्यांमध्ये नेलपॉलिश का ठेवली जात नाही? जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर आज जाणून घेऊया यामागे कोणते कारण आहे.
काचेची बाटली का वापरतात?
नेलपॉलिश सहसा काचेच्या बाटल्यांमध्ये साठवले जाते. कारण काच गैर-प्रतिक्रियाशील आहे. काच नॉन-रिॲक्टिव्ह असल्यामुळे नेलपॉलिशमध्ये असलेल्या रसायनांच्या संपर्कात येत नाही. ज्यामुळे नेलपॉलिशची गुणवत्ता टिकून राहते. याशिवाय काच मजबूत असते. त्यामुळे हवा आणि आर्द्रता नेलपॉलिशपर्यंत पोहोचू शकत नाही आणि नेलपॉलिश जास्त दिवस टिकून राहते.
ग्राहकांना नेल पॉलिश निवडणे सोईस्कर
नेलपॉलिश काचेच्या बाटलीत असल्यामुळे नेलपॉलिश लवकर सुकत नाही आणि त्यात ओलावाही येत नाही. याशिवाय नेलपॉलिश काचेच्या बाटलीत असल्याने ग्राहक सहजपणे नेलपेंटचा रंग पाहून आपल्या आवडीनुसार खरेदी करू शकतात.
काचेच्या बाटलीत नेलपॉलिश ठेवण्याचा उद्देश म्हणजे नेलपेंट खराब होऊ नये आणि ग्राहकाला त्याच्या आवडीचा रंग निवडता येईल. याशिवाय, ज्या रसायनाने नेलपॉलिश तयार केली जाते त्या रसायनावर प्लास्टिकची प्रतिक्रिया होते.
जेव्हा नेलपॉलिश आणि प्लास्टिकची प्रतिक्रिया होते तेव्हा प्लास्टिकची बाटली खराब होते, तर नेलपॉलिशमधील रसायने काचेच्या बाटलीमध्ये कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे नेलपॉलिश ठेवण्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.