See Owl Is Sign Of Positivity Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Owl: घुबड पाहणे मानले जाते 'शुभ'

एकीकडे जिथे घुबडाला पाहाणे अशुभ मानले जाते तिथे दुसरीकडे मात्र घुबड पाहाणे हे शुभ मानले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

Owl Is Sign Of Positivity: हिंदू धर्मात घुबड पाहाणे किंवा दिसणे याला अशुभ मानले गेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्यक्षात घुबड पाहाणे हे आजही आपल्यापैकी अनेक शिकलेल्या माणसांनही अशुभ मानतात.

एकीकडे जिथे घुबडाला पाहाणे अशुभ मानले जाते तिथे दुसरीकडे मात्र घुबड पाहाणे हे अशुभ नसून अत्यंत शुभ असल्याचं धर्मशास्त्राचे अभ्यासक सांगतात.

घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन मानले गेले आहे. घुबड पाहाणं?, अचानक तुमच्यासमोर घुबड येणं? हे शुभ का मानले जाते? याची कारणे जाणून घेउया.

  • रात्रीच्या वेळेस घुबड दिसण्याच्या काय अर्थ

घुबड साधारणपणे लाजाळू असतात. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी घुबड दिसले तर ते शुभ मानले जाते. रात्री घुबड दिसणे हे समस्यांपासून मुक्त होण्याचे संकेत मानले जातात. यासोबतच ते करिअरमध्ये यश मिळण्यास मदत करतात.

  • अचानक घुबड दिसण्याच्या काय अर्थ

अनेक वेळा रात्री अचानक घुबड दिसतात. जर घुबड सतत तुमच्याकडे एकटक पाहत असेल किंवा तुमची आणि घुबडाची वारंवार नजरानजर होत असेल हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

याशिवाय तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या लवकरच संपुष्टात येणार आहेत. तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला घुबड दिसले तर ते शुभ मानले जाते. 

Owl:
  • दिवसा घुबड दिसण्याच्या काय अर्थ

जर एखाद्या व्यक्तीला दिवसा घुबड दिसले तर ते शुभ मानले जाते. हे एक लक्षण आहे की तुमचे नशीब नक्की उजळेल. तसेच तुमच्या आयुष्यात लवकरच काही सकारात्मक बदल होणार आहेत.

  • पांढरे घुबड दिसण्याच्या काय अर्थ

आपण सर्वांनी काळे किंवा तपकिरी घुबड पाहिले असेलच, परंतु हिंदू धर्म शास्त्रानुसार पांढरे घुबड पाहणे शुभ मानले जाते. पांढऱ्या रंगाचे घुबड हे कधीतरीच दिसतात. जर एखाद्या व्यक्तीला पांढरे घुबड दिसले तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यापासून सुटका होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT