WhatsApp Tips: देशभरात व्हॉट्सअॅप स्कॅम दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्हॉट्सअॅप नवीन सिक्युरिटी फीचर्सवरही काम करत आहे. पण फार कमी लोकांना याची माहिती आहे. पण तुम्ही काही पद्धतींचा वापर करून तुमचे व्हॉट्सअॅप अकाउट सुरक्षित ठेऊ शकता.
6 अंकी व्हेरिफिकेशन कोड शेअर करू नका
व्हॉट्सअॅपमध्ये एक 6 अंकी सुरक्षा कोड असतो, तो चालू केल्यानंतर, भविष्यात जेव्हाही तुम्ही ते अकाउंट लॉग इन कराल तेव्हा हा कोड तुमच्याकडून विचारला जाईल. हा कोड संदेश किंवा कॉलद्वारे प्राप्त होतो. या कोडच्या मदतीने कोणतेही व्हॉट्सअॅप अकाउंट लॉग इन करता येते.
अकाउंटचा एक्सेस बंद करा
तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंटचा अचानक एक्सेस गमावत असल्यास किंवा लॉग आऊट झाल्यास तुम्ही सतर्क व्हायला पाहिजे. असे झाल्यास, ताबडतोब आपल्या खात्यात लॉग इन करा. याशिवाय, जर तुम्ही लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप लॉगिन केले असेल तर लिंक केलेल्या डिव्हाइसमध्ये कोणत्या डिव्हाइसची नावे दिसत आहेत ते देखील तपासा.
व्हॉट्सअॅप नेहमी अपडेट ठेवा
जर तुम्ही व्हॉट्सअॅप ची जुने व्हर्जन वापरत असाल तर तुमचे व्हॉट्सअॅप हॅक होण्याचा धोका जास्त आहे किंवा त्याच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅप नेहमी अपडेट करत रहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.