Migraine  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास मायग्रेनची समस्या होणार दुर

Stop Migraine And Headache: मायग्रेनची समस्या केवळ वाईट जीवनशैलीमुळे भेडसाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या िजवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार निर्माण होतात. असाच एक धोकादायक आजार म्हणजे मायग्रेन. ज्या व्यक्तीना मायग्रेनचा त्रास असतो, त्यांना डोकेदुखीची समस्या असते. मायग्रेनच्या रुग्णाने सर्वात आधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की कशामुळे त्यांना मायग्रेनचा त्रास वाढतो. मायग्रेन होण्यामागची कारणे कोणती आहेत हे जाणून घेऊया. (Stop Migraine And Headache News)

तणाव

सध्या सर्वाना चिंता आणि तणाव असल्याने सर्व आजार वाढतात. त्यामुळे मायग्रेनचा त्रासही वाढतो. काहींना ऑफिसच्या कामाच्या टेन्शनमुळे डोकेदुखी होते. हे मायग्रेनचेही (Migraine) कारण असू शकते.

अॅसिड किंवा गॅस

अनेक लोकांना अॅसिडची समस्या असल्याने मायग्रेनचा त्रास होतो. अशा लोकांना डोकेदुखी वाढुन उलट्या होतात. त्यामुळे अॅसिड बाहेर पडते आणि वेदना कमी होतात. तर काही लोकांना पोटात गॅस झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.

दिनचर्येत व्यत्यय

मायग्रेनचे एक प्रमुख कारण म्हणजे दिनचर्येत अडथळा येणे होय. जीवनशैली बदलल्यानंतर अनेक लोकांना डोकेदुखीची समस्या सुरू होते. अशा लोकांना खाण्यापिण्याच्या (Diet) सवयींमध्ये अडथळे, झोप न लागणे, वाढलेली चिंता आणि ताणतणाव किंवा प्रवासातही डोकेदुखीचा त्रास होतो.

अपुरी झोप

अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या असते. यामुळे बराच वेळ झोप न घेतल्याने डोकेदुखीची समस्या वाढू लागते. अपुरी झोप घेतल्याने थकवा आणि अशक्तपणा येतो. अन्न पचत नाही आणि शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. या कारणामुळेसुध्दा मायग्रेनचा त्रास वाढतो.

उष्णता

उन्हाळ्यात (Summer) मायग्रेनचा त्रास खूप वाढू शकतो. कडक उन्हात बाहेर गेल्यावरही डोकेदुखी सुरू होते. अचानक एसीमधून बाहेर पडल्यास तापमानात बदल होतो आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. याशिवाय अति उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT