Dementia  
लाइफस्टाइल

Dementia म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, चीज खाल्ल्याने धोका कमी होतो का? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे

डिमेंशियाची खूप गंभीर आहे, वाढत्या वयानुसार विविध समस्या वाढत जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

डिमेंशिया म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास डिमेंशिया म्हणजे स्मृतिभ्रंश, Dementia हा शब्द 'डी' म्हणजे 'शिवाय' आणि 'मेंशिया' म्हणजे मन यापासून बनलेला आहे.

लहान-लहान गोष्टी विसरण्याच्या समस्येला स्मृतिभ्रंश म्हणतात असे मानले जाते. पण, गोष्टी विसरणे किंवा स्मरणशक्ती कमकुवत होणे हे त्याचे एकमेव लक्षण नाही. डिमेंशियाची समस्या यापेक्षा खूपच गंभीर आहे. यात इतर अनेक चिंताजनक लक्षणे देखील असू शकतात. या लक्षणांचा रुग्णाच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. वाढत्या वयानुसार या समस्या वाढत जातात.

स्मृतिभ्रंश म्हणजे काय? (What Is Dementia)

वाढत्या वयाबरोबर लोकांमध्ये होणाऱ्या मानसिक बदलांना अनेकजण वेडेपणा मानतात. पण हा डिमेंशिया देखील असू शकतो, ज्याचा अर्थ वेडेपणा असा होत नाही.

स्मृतिभ्रंश हा आजार नसून मेंदूला इजा झाल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनात होणाऱ्या बदलांमुळे उद्भवणाऱ्या लक्षणांचे नाव आहे. डिमेंशियाचा रुग्ण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कमजोर होतो. दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठीही त्याला इतरांची मदत घ्यावी लागते.

स्मृतिभ्रंश हा आजार नाही तर, अल्झायमर/ टेन्शन/ डिप्रेशन /तणाव किंवा कोणत्याही धक्क्यामुळे मेंदूला इजा झाल्यास ही समस्या उद्भवते. अल्झायमर हे स्मृतिभ्रंशाचे मुख्य कारण मानले जाते.

स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना अनेकदा घटना, भेटीगाठी किंवा परिचित लोकांची नावे लक्षात ठेवण्यास त्रास होतो. त्यांना प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते किंवा आठवण करून द्यावी लागते.

डिमेंशियाची लक्षणे कोणती? (Symptoms Of Dementia) 

डिमेंशियाने ग्रस्त लोकांसाठी निर्णय घेणे आव्हानात्मक ठरते, ते चुकीची निवड करू शकतात किंवा अयोग्य निर्णय घेऊ शकतात. काहीवेळा ते अशा गोष्टीही बोलतात ज्यात काही तर्क नाही.

अल्झायमर किंवा इतर स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना तारखा, ऋतू आणि वेळ याची आठवण ठेवण्यात त्रास होऊ शकतो. कधी कधी ते कुठे आहेत किंवा ते तिथे कसे पोहोचले हे देखील विसरू शकतात.

अलीकडील जपानी अभ्यासानुसार, स्मृतीभ्रंश किंवा पार्किन्सन्ससारख्या मेंदूच्या इतर समस्या कमी करण्यासाठी चीज खूप फायदेशीर असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जे लोक जास्त चीज खातात त्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो.

संशोधकांनी 65 आणि त्याहून अधिक वयाच्या जवळपास 1,600 प्रौढ लोकाच्या डेटाचे विश्लेषण केले. यात ज्या व्यक्तींनी सर्वात जास्त चीज खाल्ले त्यांना डिमेंशियाचा धोका कमीत कमी चीज खाणाऱ्यांच्या तुलनेत 44 टक्के कमी असतो, असे दिसून आले. याव्यतिरिक्त, चीज खाणाऱ्यांना पार्किन्सन्स आणि स्ट्रोक सारख्या इतर मेंदूच्या आजारांचा धोका कमी असतो, असेही संशोधनात असे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT