World Aids Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Aids Day : HIV संक्रमण झाल्यास घरच्या घरी कोणती काळजी घ्याल? काय सांगतो आयुर्वेद?

एचआयव्ही संसर्ग झाल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आयुर्वेदीक आणि घरगुती पद्धतीचे असे काही उपाय आहेत जे कमी खर्चाचे असून आपण रोज करू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

जर एचआयव्ही (HIV) संसर्गाचे योग्य वेळी निदान झाले नाही, त्यावर योग्य उपचार केला गेला नाही तर त्या व्यक्तीला एड्स (AIDS) होण्याचा धोका जास्त असतो. एड्स हा एचआयव्हीचा शेवटचा टप्पा आहे आणि या अवस्थेत त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते, की त्याला कोणतंही संक्रमण सहजतेनं होतं आणि योग्यवेळेवर उपचार-काळजी नाही घेतली तर व्यक्ती दगावू शकतो.

एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये सुरुवातीला काही लक्षणे दिसू लागतात. वारंवार होणारे किरकोळ संक्रमण हे देखील एचआयव्हीचे प्रारंभिक लक्षण आहे. पण काही लोकांमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा आणि घसा खवखवणे, अशक्तपणा, सुजलेल्या ग्रंथी, घसा खवखवणे, स्नायूंमध्ये वेदना, सांधेदुखी, रात्री घाम येणे, अतिसार ही एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे आहेत.

एचआयव्ही संसर्ग झाल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आयुर्वेदीक आणि घरगुती पद्धतीचे असे काही उपाय आहेत जे कमी खर्चाचे असून आपण रोज करू शकतो.

शांत झोप आणि व्यायाम- एचआयव्हीग्रस्त लोक शारीरिकदृष्टया कमकुवत असतात आणि त्यांचं वजन देखील कमी होतं. अशा परस्थितीत त्यांना दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे जेणेकरून स्नायू आणि हाडं मजबूत राहतील. त्यांनी असा व्यायाम निवडला पाहिजे ज्यामुळे शारीरिक तणाव निर्माण होणार नाही. तसंच त्यांना दिवसातून कमीत कमी 8 तास झोप मिळणं आवश्यक आहे. जेणेकरून शरीर संक्रमणास अधिक सहजपणे लढायला सक्षम होईल.

मानसिक आणि भावनिक आरोग्य- एचआयव्ही बाधित व्यक्तीसाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत अधिक चिंता आणि तणावयुक्त गोष्टींचा अधिक परिणाम होतो. एचआयव्हीच्या निदानानंतर मानसिक धक्का जाणवू शकतो मात्र त्यातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी मित्र आणि कुटुंबाच्या कायम संपर्कात रहावं. कारण एकाकीपणामुळे नैराश्यात जाण्याचा धोका असू शकतो.

व्यसनांपासून दूर रहा- एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मद्यपान किंवा ड्रग्स घेतल्यानं उपचारांचा उपयोग होणार नाही. चक्कर येणं आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती सोडावी अन्यथा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

सूर्यप्रकाशाचा उपयोग- सकाळच्या कोवळ्या उन्हात काहीवेळ बसल्याने उन्हातून मिळणारी जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळतात. आजारी, अशक्त व्यक्तींनी हा प्रयोग जरूर करावा. अशाने शरीरात तयारी होणारी उष्णता उपयोगी ठरते.

पाणी आणि जलपदार्थांचे सेवन- दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे ही निरोगी जीवनासाठी आवश्यक असते. हायड्रेशन शरीराच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करते. यामुळे चयापचय गतिमान होते. शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. दूध, ताक, लस्सी, पीयूष, फळांचे रस इत्यादी पदार्थांचा दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील उपाय हे प्राथमिक आणि घरगुती स्वरूपाचे असून या उपायांसोबतच तातडीने वैद्यकीय उपचार घेणे हेही तितकेच आवश्यक ठरते.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT