World AIDS Day 2022: 'जागतिक एड्स दिन' दरवर्षी का केला जातो साजरा? वाचा महत्त्व अन् इतिहास

एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
World AIDS Day 2022
World AIDS Day 2022Dainik Gomantak

एड्स हा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) च्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा विषाणू संक्रमित रक्त, वीर्य आणि योनीमार्गातील द्रव्यांच्या संपर्कात आल्याने पसरतो. या आजाराबाबत अनेक गैरसमज सामाजात पसरवले जातात. 1 डिसेंबर हा दिवस जगभरात 'जागतिक एड्स दिन' (World AIDS Day 2022) म्हणून साजरा केला जातो. एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज या दिनानिमित्त आपण त्याचे महत्व जाणून घेणार आहोत.

  • जागतिक एड्स दिन 2022 ची थीम काय आहे?
    2022 चा जागतिक एड्स दिन समानता  (Equalize) या थीम अंतर्गत साजरा करण्यात येणार आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र त्यानुसार जागतिक एड्स दिन ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायासाठी एक संधी आहे, ज्यामध्ये ते जगभरात या आजारामुळे आपला जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्मरण आणि सन्मान करू शकतात. या वर्षीची थीम जागतिक एड्स दिनाने जागतिक स्तरावर लोकांना सतर्क केलेल्या आव्हानांच्या यादीत सामील झाली आहे.

  • जागतिक एड्स दिनाचा इतिहास

    हा दिवस 1988 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिक एड्स दिन हा जागतिक आरोग्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस होता. दरवर्षी, युनायटेड नेशन्स एजन्सी, सरकार आणि व्यक्ती एचआयव्हीशी (HIV) संबंधित खास थीमवर मोहीम राबवण्यासाठी एकत्र येतात. या दिवशी लोकांनामध्ये जनजागरूक करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. बरेच लोक या आजाराने ग्रस्त लोकांसाठी जागरूकता आणि समर्थनाचे प्रतीक म्हणून लाल रिबीन घालतात.

World AIDS Day 2022
HIV AIDS Early Symptoms: तुम्हाला एड्स आहे की नाही कसे ओळखाल?
  • जागतिक एड्स दिनाचे महत्त्व
    जागतिक एड्स दिनाला खूप महत्व आहे. कारण या दिवसामुळे जनतेला आणि सरकारला याची आठवण करून देतो की हा आजार अजूनही अस्तित्वात आहे आणि अजूनही या आजाराने ग्रस्त लोकांसाठी जागरूकता (Awareness) निर्माण करण्याची आणि पैसे उभारण्याची गरज आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com