कामाचा ताण, धावपळ यामुळे आजकाल डोके किंवा डोळे दुखणे सामान्य आहे. प्रत्येकजण या समस्येने हैराण आहे. अगदी लहान मुलेही कधी कधी डोळे दुखण्याची तक्रार करतात. नुसतेच डोळे दुखत असतील तर नक्की नेत्रतपासणी करुन घ्या. डोळ्यांसोबतच डोके दुखत असेल तर त्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. अनेक वेळा डोळ्यांना आणि डोक्यात इतके असह्य वेदना होतात की काय करावे समजत नाही. वास्तविक, डोके आणि डोळे दुखणे देखील मायग्रेन, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामागची नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊयात.
मायग्रेन (Migraine) - डोक्याची एकच बाजू आणि कधी कधी डोळ्याच्या मागे तीव्र वेदना होत असतील तर ही मायग्रेनची लक्षणे आहेत. कधीकधी 72 तासांपर्यंत या वेदना टिकून राहू शकतात. यात तुम्हाला मळमळ, नाक वाहणे किंवा रक्तसंचय वाटू शकतो. तुम्हाला लाईट, ध्वनी किंवा कोणत्याही वासाची अॅलर्जी होऊ शकते.
सायनस (Sinus) - कधी कधी डोळे आणि डोके दुखण्याचे कारण सायनस इन्फेक्शन देखील असू शकते. सायनसमध्ये डोळे, कपाळ, गाल, नाक आणि वरच्या दातांमध्ये वेदना होऊ शकतात. ही वेदना तुम्हाला दिवसभरात अनेक वेळा जाणवू शकते. सायनुसायटिस बहुतेकदा ऍलर्जीमुळे होते.
तणाव (Stress) - तणावामुळे होणारी वेदना ही डोक्याच्या दोन्ही बाजूंना किंवा डोक्याच्या समोर, डोळ्यांच्या मागे सौम्य वेदना होत असते. तणावग्रस्त डोकेदुखी बहुतेकदा स्त्रियांमध्ये होते. ही वेदना अर्ध्या तासापासून काही तासांपर्यंत असू शकते.
क्लस्टर डोकेदुखी (Cluster Headache)- क्लस्टर डोकेदुखीमुळे डोळ्याभोवती तीव्र वेदना होतात. वेदना मुख्यतः एकाच डोळ्याभोवती होते. दुखण्यासोबतच डोळ्यात पाणी येण्याची आणि डोळे लाल होण्याची समस्या देखील असू शकते. कधीकधी ते इतके दुखते की आपण अस्वस्थ होऊ शकतो. जरी ही एक सामान्य डोकेदुखी नसली आणि बहुतेक पुरुषांना होत असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.