सहसा आपण दिवसातून किमान तीन वेळा जेवण करत असतो. किंवा जेवणाव्यतिरिक्त काही तरी खात असतो. जेवणातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण साधारणत: असे जेवणाची आपली सवय असते. पण, याचा वेळा निश्चित नसतात. त्यात वारंवार बदल केले तर आपल्याला त्रास होणार हे जवजवळ निश्चित आहे. तर, जेवण करताना कोणत्या चुका करू नयेत याची माहिती आपण पाहणार आहोत. (Never make these mistakes while having food)
जेवण करण्यापूर्वी दही खाऊ नये (Do not eat curd before meals)
दही थंड आहे आणि ते पचनासाठी उपयुक्त मानले जाते. परंतु दही जेवणापूर्वी किंवा रिकाम्या पोटी खाऊ नये, कारण ते पोटातील आम्लता कमी करते. दही नेहमी जेवणानंतर खावे, यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढते आणि आपल्या स्नायूंचा विकास होतो.
रात्रीच्या जेवणात भात खाणे टाळा (Avoid rice in dinner)
भात हा आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे, पण तो रात्री खाऊ नये. तांदूळात कर्बोदके भरपूर प्रमाणात असल्याने त्याचे पचन होण्यास वेळ लागतो. यामध्ये असलेल्या कॅलरीजमुळे तुमचे वजन वाढू शकते.
अतिगरम दूध पिऊ नये (Do not drink too hot milk)
दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते कारण त्यात जवळजवळ सर्व पोषक घटक असतात, परंतु दुधाचे सेवन कधीही जास्त गरम करू नये कारण त्यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात. मात्र, कोमट दूध प्यायल्याने कोणताही त्रास होत नाही.
रिकाम्या पोटी केळी खाणे (Eating bananas on an empty stomach)
केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे यात शंका नाही, तरीही ते योग्य वेळी न खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. केळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका, यामुळे अतिसार आणि आतड्यांसंबंधी सिंड्रोम सारख्या समस्या होऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.