West Nile Virus Dainik Gomantak
लाइफस्टाइल

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

West Nile Virus Cases: जगभरातील अनेक देशांमध्ये 'वेस्ट नाईल व्हायरस' च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Manish Jadhav

West Nile Virus Cases: जगभरातील अनेक देशांमध्ये 'वेस्ट नाईल व्हायरस' (West Nile Virus) च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इटली आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये या विषाणूचे अनेक रुग्ण आढळले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 30 हून अधिक लोकांना या संसर्गाची लागण झाली असून, दोघांचा मृत्यूही झाला आहे.

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्येही डासांमध्ये या विषाणूची (Virus) पुष्टी झाली आहे, तर अनेक लोकांमध्ये गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांसारखी लक्षणे दिसून आली आहेत. युक्रेन आणि इतर युरोपीय देशांमध्येही या संसर्गाची नोंद झाली असून, हा विषाणू हळूहळू जगभरात पसरत असल्याचे हे आकडे दर्शवतात. भारतात या विषाणूचा धोका सध्या कमी असला, तरी यावर वेळीच सतर्क राहणे आवश्यक आहे.

वेस्ट नाईल व्हायरस म्हणजे काय?

डॉ. जुगल किशोर यांच्या मते, वेस्ट नाईल व्हायरस हा एक डासांमुळे पसरणारा संसर्ग आहे. हा विषाणू 'फ्लॅविव्हायरस' (Flavivirus) नावाच्या विषाणूमुळे होतो. मुख्यत्वे 'क्युलेक्स' (Culex) प्रजातीच्या डासांच्या चावण्यामुळे हा मानवांमध्ये पसरतो. 'क्युलेक्स' डास साधारणपणे रात्रीच्या वेळी चावतो. हा विषाणू आधी पक्ष्यांमध्ये आढळतो. जेव्हा एखादा डास संक्रमित पक्ष्याचे रक्त शोषतो, तेव्हा तो स्वतः संक्रमित होतो आणि नंतर तोच डास एखाद्या माणसाला चावल्यास, हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात डासांची संख्या वाढल्यामुळे या रोगाचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असते.

लक्षणे आणि धोका

वेस्ट नाईल व्हायरसने संक्रमित झालेल्या बहुतेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु काही लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसू शकतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, उलटी, जुलाब, स्नायूंमध्ये कडकपणा आणि शरीरावर पुरळ येणे यांचा समावेश आहे. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर 3 ते 14 दिवसांनी दिसू शकतात.

वृद्ध व्यक्ती, लहान मुले, आधीच आजारी असलेले आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असलेल्या लोकांसाठी हा विषाणू अधिक धोकादायक ठरु शकतो. तसेच, ज्या लोकांचा डासांनी भरलेल्या ठिकाणी जास्त वेळ जातो, त्यांनाही या संसर्गाचा धोका अधिक असतो. वेळीच लक्षणांची ओळख करुन उपचार करणे महत्त्वाचे आहे.

उपाय आणि खबरदारी

वेस्ट नाईल व्हायरसच्या बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्ग सौम्य असतो आणि कोणत्याही विशेष उपचारांशिवाय तो बरा होतो. पण काही प्रकरणांमध्ये तो जीवघेणाही ठरु शकतो. हा विषाणू मेंदू, मणक्याच्या हाडावर सूज आणू शकतो, ज्यामुळे ताप, संभ्रम, मान कडक होणे, झटके येणे किंवा बेशुद्ध होणे यांसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

सध्या या विषाणूवर कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. उपचार फक्त लक्षणांवर आधारित असतो, जसे की ताप कमी करणे, शरीराला हायड्रेटेड ठेवणे आणि आराम करणे. त्यामुळे, यापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

  • घर आणि परिसरामध्ये पाणी साचू देऊ नका.

  • पौष्टिक आहार घ्या.

  • शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घाला.

  • डासांना पळवून लावणारे रिपेलंट्स आणि कॉईल वापरा.

  • संध्याकाळी आणि रात्री घराबाहेर जाताना विशेष काळजी घ्या.

  • घरातील दारे आणि खिडक्यांना जाळी (नेट) लावा.

  • ताप किंवा इतर लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT