वाढते वजन सध्या अनेकांची डोकेदुखी बनले आहे. वाईट जीवनशैलीमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत आणि त्यांना वजन कमी करायचे आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा कार्बोहायड्रेट खाणे बंद करतात, पण तुम्हाला माहित आहे का की रोज बटाटे खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी याबाबत दावा केला असून स्टार्चयुक्त बटाटा वजन कमी करण्यास मदत करू शकतो, असे म्हटले आहे. (Weight Loss With Potato)
जास्त कॅलरी घेतल्याने वाढते वजन
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक कधीकधी अशा गोष्टी खातात, ज्यामध्ये जास्त कॅलरी असतात. त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. त्यामुळे तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर अशा अन्नाचा आहारात समावेश करा, ज्यामुळे पोट लवकर भरते आणि कमी कॅलरीज असतात. यासाठी बटाटा हा चांगला पर्याय आहे.
बटाट्याबद्दल संशोधन काय सांगते?
संशोधकांचे म्हणणे आहे की, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते, परंतु ते खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. पोट लवकर भरल्यामुळे बाकीचे लोक त्या तुलनेत कमी अन्न खातात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, ते शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पद्धत माहिती करून घेणे गरजेचे आहे.
बटाटे शिजवून खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
संशोधकांचे म्हणणे आहे की वजन कमी करण्यासाठी बटाटे शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पद्धत अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चिप्स किंवा तेलात तळलेले बटाटे खाणे टाळावे. त्यामुळे पोषण कमी होते आणि त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
उकडलेले बटाटे खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे संशोधनात समोर आले आहे. उकडलेले बटाटे खाल्ल्यानंतर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि त्यांना भूक लागत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.