Shani Krupa: शनिवारी 'या' 3 गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

शनिवारी या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते.
Shani Dev
Shani DevDainik Gomantak
Published on
Updated on

शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो. सामान्यतः शनिदेवाचा स्वभाव अतिशय क्रूर असल्याचे म्हटले जाते. पण तसे नाही. खरे तर शनिदेव हे न्यायाचे देव आहेत. जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.शनिवारी शनि देवाची आराधना करणे लाभदायी असते. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी शनि साडेसातीला सामोरे जावे लागते. परंतु जर तुमची कर्म चांगले असतील तर या स्थितीतही तुमचे कधीही वाईट होणार नाही.

म्हणूनच कर्म चांगले करा. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कर्मावर शनि भगवान प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळतो, तर त्याचे भाग्य उजळते. त्याचा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही.

शनिदेवाने तुमच्यावर कृपा केली आहे, हे तुम्ही काही संकेतावरुन जाणून घेऊ शकता. शनिवारी सकाळी रस्त्यावर या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की, ही शनिदेवाची महिमा आहे. हे लक्षण आहे की शनिदेवाच्या कृपेने तुमचे भाग्य लवकरच चमकणार आहे. तुमच्या आयुष्यातील समस्या संपल्यानंतर चांगले दिवस येणार आहेत.

भिकारी

शनिदेव गरजूंना मदत केल्याने प्रसन्न होतात. शनिवारी सकाळी एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला कधीही शिवीगाळ करून हाकलून देऊ नका. हे खूप शुभ मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार दान करून त्याला मदत करा. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात.

Begging
BeggingDainik Gomantak

काळा कुत्रा

शनिवारी सकाळी रस्त्यावर काळे कुत्रा दिसणे शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. शनिवारी काळ्या कुत्र्याला दूध, रोटी, मोहरीच्या तेलाचा पराठा, भाकरी वगैरे खाऊ घाला. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो.

black dog
black dogDainik Gomantak

सफाई कामगार

जर तुम्ही सकाळी काही काम करण्यासाठी घराबाहेर पडला असाल आणि अचानक तुम्हाला एखादा कामगार रस्ता झाडताना दिसला तर ते देखील खूप शुभ मानले जाते. त्या व्यक्तीला तुमच्या बाजूने शक्य असेल तर नक्कीच मदत करा. याचा अर्थ आता शनिदेव तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.

worker
workerDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com