Weight Loss Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वजन कमी करायचय? मग Breakfast मध्ये खा 'हा' पदार्थ

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

दैनिक गोमन्तक

Weight Loss Tips: उपमा हा एक प्रसिद्ध साउथ इंडियन नाश्ता आहे. हे विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये लोकप्रिय आहे. आता उत्तर भारतातही या पदार्थाला पसंती मिळत आहे. 

सध्या वाढत्या वजनामुळे लोक त्रस्त झाले आहेत. जे लोक आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी उपमा हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रव्यामध्ये बी जीवनसत्त्वे, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. जे ऊर्जा प्रदान करतात आणि स्नायू तंतूंचे योग्य कार्य करण्यास मदत करतात.

उपम्यामध्ये पाचक फायबर असतात. जे पचन सुलभ करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते.

  • उपमा कसा बनवतात

उपमा तयार करण्यासाठी रवा चांगला भाजला जातो. त्यात उडीद डाळ, कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून मिक्स केले जाते. चवीनुसार मीठ घालून, योग्य प्रमाणात पाणी घालून मंद आचेवर थोडा शिजवला जातो. तयार आहे तुमचा स्वादिष्ट उपमा.  

  • भाज्या मिक्स कराव्या

उपमा विविध पद्धतीने बनवला जातो. अनेक लोक उपम्यामध्ये भाजी बारिक चिरून टाकतात. यामुळे चव तर वाढतेच आणि पौष्टिक देखील होते. शिमला मिरची, गाजर वाटाणा यासारख्या भाज्या टाकू शकता. तसेच तुप आणि तेलाचा कमी वापर करावा. याशिवाय उपमा चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता.

  • कॅलरीचे प्रमाण कमी

रव्यामध्ये लीक-फ्री कार्बोहायड्रेट्स असतात. जे वेगाने पचतात आणि त्वरीत ऊर्जेत रूपांतरित होतात. याचा अर्थ ते शरीरात जमा होत नाही. रवा हे कमी उष्मांक असलेले धान्य आहे. जे वजन कमी करण्यास मदत करते. यातून मिळणारे पाचक फायबर शरीराला दीर्घकाळ तृप्त ठेवते, त्यामुळे अनावश्यक खाणे-पिणे टाळता येते. 

  • पोट लवकर भरते

नाश्त्यासाठी रवा हा एक चांगला पर्याय आहे. कारण रव्यामध्ये पाचक फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. उपमा खाल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. तुम्ही रवा सेवन केल्यावर ते तुमच्या पोटात पसरते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. हेच कारण आहे की उपमा किंवा इडली सारखे पदार्थ सामान्यतः नाश्त्यामध्ये खाल्ले जातात. यामुळे पोट लवकर भरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT