celery seeds
celery seeds Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: भाजलेला ओव सर्दी-फ्लूवर ठरतो रामबाण उपाय

दैनिक गोमन्तक

Health Benefits of Roasted Ajwain: हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला यासारख्या समस्या लोकांना त्रास देऊ लागतात. जर तुम्ही सर्दी-फ्लूवर तुमच्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर भाजलेला ओवा तुम्हाला तुमच्या समस्या दुर करु शकते. तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा ओव्याचा वापर अन्नाचा सुगंध वाढवण्यासाठी आणि तुमची पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी केला असेल, पण तुम्हाला माहित आहे का की ओवा तुमच्या पचनासाठी फायदेशीर तर आहेच पण सर्दी आणि फ्लू सोबतच तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत. जे शरीराचे अनेक आजारा दुर ठेवतात. तसेच संसर्ग कमी करून वेदना कमी करतात. एवढेच नाही तर वजन (Weight) कमी करण्यासाठी लोक ओव्याचे पाणी आणि ओव्याच्या पावडरचा वापर करतात.

भाजलेला ओवा खाण्याचे फायदे

  • वेट लॉस

भाजलेला ओवा पचनक्रिया जलद करण्याचे काम करते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. हा उपाय करण्यासाठी ओवा, मेथी आणि बडीशेप समप्रमाणात भाजून घ्या आणि एकत्र करून सेवन करा. हे मिश्रण तुम्ही हवाबंद डब्यात ठेउ शकता. दररोज झोपण्यापूर्वी एक चमचा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्यावे.

  • ब्लोटिंग पासून बचाव

ओव्याचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर पचनाच्या समस्या दूर करण्यासाठीही केला जातो. बर्‍याच वेळा लोकांना खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची म्हणजेच ब्लोटिंगची समस्या असते. अशा वेळी ओवा पाचक एन्झाईम्स वाढवून अन्न जलद पचण्यास मदत करते. त्याचे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म पोटातील जळजळ कमी करून फुगणे टाळण्यास मदत करतात.

  • अ‍ॅसिडिटी

अनेक लोकांना अ‍ॅसिडिटीची समस्या असते. ओव्यामध्ये असलेले थायमॉल, सक्रिय एन्झाइम, गॅस्ट्रिक ज्यूस स्राव करण्यास मदत करते. ज्यामुळे पचन सुधारते. पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा पाण्यासोबत घ्या.

  • सर्दी आणि फ्लूवर फायदेशीर

ओवा खोकला तसेच थुंकीच्या समस्येमध्ये आराम देण्याचे काम करू शकते. हे ब्रोन्कियल नलिका रुंद करण्यास मदत करून दम्याच्या रुग्णांना देखील मदत करू शकते. त्याचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म एखाद्या व्यक्तीला हंगामी इंफेक्शनपासून वाचवण्यास मदत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT