Weight Loss Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Drink: पोट साफ करण्यासोबतच 'हे' पेय वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

Weight Loss Drink: तुम्हीही वाढत्या वजन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रासलेले असाल तर डिटॉक्स वॉटरचा आहारात समावेश करू शकता.

Puja Bonkile

Weight Loss Drink chia lemon strawberry water for weight loss constipation stomach problem

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये अधिक लोक वाढत्या वजन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येशी झुंजत आहेत. शरीराचे वाढते वजन अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देत असताना, बद्धकोष्ठतेमुळे नेहमीच अस्वस्थता येते.

या दोन्ही समस्या एकमेकांशी संबंधित आहेत. जेव्हा तुमची पचनसंस्था निरोगी राहते, तेव्हा तुमचे वजनही निरोगी राहते. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात विशेष प्रकारचे डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करू शकता. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

डिटॉक्स वॉटरसाठी लागणारे साहित्य

संत्री - 2 ते 3 काप

एक चमचा सब्जा बिया

स्ट्रॉबेरी - 2 ते 4

काकडी - 2 ते 4 काप

लिंबू - 2 तुकडे

कसे बनवाल डिटॉक्स वॉटर

वरील सर्व साहित्य एका बाटलीत भरा आणि काही तास तसेच ठेवा. नंतर त्याचे सेवन करा. या बाटलीतील पाण्याचे दोन दिवस सेवन करू शकता.

डिटॉक्स वॉटरचे फायदे

डिटॉक्स वॉटरमध्ये असलेले सब्जा बिया आणि लिंबू पचनसंस्था सुरळित ठेवण्यास मदत करते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. जेव्हा तुमची पचनक्रिया सुधारते तेव्हा तुमचे वजनही झपाट्याने कमी होते. सब्जा बिया पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटने समृद्ध असतात.

तसेच त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील चांगले असते. जे आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकते. यातील संत्र्यामध्ये कॅलरी कमी असते आणि त्यात फायबर असते. काकडीत कमी कॅलरी आणि शून्य चरबीमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फायबर शरीराचे चयापचय आरोग्य सुधारते आणि त्यात कॅलरी देखील खूप कमी असते.

सब्जा बिया पोटात गेल्यावर जेलीसारखे बनतात. या प्रकारच्या जेलच्या निर्मितीमुळे पोटातील मळ मऊ होण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT