Homemade Summer Drinks Recipes , Benefits of Homemade Summer Drinks in Marathi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Drinks: फिट फिगरसाठी, चमकदार त्वचेसाठी लाभदायी 'हे' 4 शीतपेय

उन्हाळ्याच्या दिवसांत या लाभदायी पेयाचे सेवन केल्याने होतील अनेक फायदे

दैनिक गोमन्तक

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जीम, डायटिंग, डायट यासारख्या अनेक पर्यायांचा वापर करता. पण याकडे थोडे जारी दुर्लक्ष केले तर वजन लगेच वाढते. असे बरेच लोक आहेत जे डाएट करून वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही वजन कमी करण्यासाठी या शीतपेयांचा वापर करू शकता तसेच त्वचा (Skin) देखील चमकदार होते. (Benefits of Summer Drinks in Marathi)

* नारळ पाणी
नारळ पाणी (Coconut Water) आरोग्यासह त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे. लो-कॅलरी पेय असण्यासोबतच त्यात अँटीऑक्सिडंट्स, अमीनो-अॅसिड्स, एन्झाईम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे त्वचा (Skin) चमकदार राहते.

* लिंबूपाणी

वजन नियंत्रित करण्यासाठी पचन संस्था देखील सुधारण्यात लिंबू पाणी मदत करते. उपाशी पोटी एक ग्लास लिंबू पाणी पिल्यास वजन कमी होऊ शकते. तसेच त्वचा देखील चमकदार राहते.

* काकडीचा रस
काकडीचा रस उन्हाळ्यात पिणे खूप फायदेशीर आहे. काकडींप्रमाणेच त्याच्या रसातही अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखी जीवनसत्त्वे असतात. काकडीचा रस सकाळचा नाश्ता केल्यानंतरच प्यावा. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच त्वचाही चमकदार होते.

* आवळ्याचा रस
रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आवळ्याचा रस प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते आणि त्वचेच्या समस्याही दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT