प्रोटीन हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेलं एक पोषक तत्व आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, स्नायू, त्वचा, केस, नखं यांचा प्रमुख घटक प्रोटीन आहे. शरीराच्या वाढीसोबतच मेंटेनन्स, इम्युनिटी, ऊर्जा आणि संपूर्ण आरोग्यासाठी प्रोटीन महत्त्वाचं काम करतं.
अनेकदा आपल्या आहारात प्रोटीन कमी प्रमाणात घेतलं जातं, ज्यामुळे शरीरात विविध प्रकारचे बदल दिसू लागतात. हे बदल अनेकदा दुर्लक्षित केले जातात, पण ही चिन्हं प्रोटीनच्या कमतरतेची असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास कोणती लक्षणं दिसतात.
जर तुम्हाला थोडंसं काम केल्यानंतरही खूप थकवा जाणवत असेल किंवा स्नायूंमध्ये ताकद नाही असं वाटत असेल, तर हे प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. प्रोटीनची कमतरता स्नायूंचं नुकसान करते आणि शरीरात ऊर्जा कमी होते.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे केसांची गुणवत्ता खालावते, ते कोरडे आणि निस्तेज होतात. केसगळती वाढते. त्याचप्रमाणे नखं सहज तुटतात, फाटतात, आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो.
प्रोटीन शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. जर शरीरात प्रोटीन कमी असेल, तर इम्युनिटी कमकुवत होते आणि शरीर वारंवार सर्दी, खोकला, ताप अशा आजारांना बळी पडतं.
शरीर सुजत
प्रोटीन शरीरातील द्रव संतुलन राखण्याचे काम करते. जर त्याचा अभाव असेल, तर शरीरात सूज येऊ शकते, विशेषतः पाय, पोट किंवा चेहऱ्यावर. ही सूज "हायपोअल्ब्युमिनेमिया" मुळे येते, ज्यामध्ये शरीरात प्रोटीनचं प्रमाण खूपच कमी झालेलं असतं.
प्रोटीन पेशींना दुरुस्त करण्यात मदत करतं. त्यामुळे शरीरावर कुठलीही जखम झाल्यास, ती लवकर भरून यावी यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. जर जखम बरी होण्यास जास्त वेळ लागत असेल, तर हे प्रोटीनच्या कमतरतेचं संकेत असू शकतं.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावतो. त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन कमी होऊ लागतं. कधी कधी पोट भरल्यासारखं वाटतं पण पोषण तुटलेलं असतं.
जर हि लक्षणं दिसत असतील तर आपल्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रोटीन मिळवण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करावा:
शाकाहारींसाठी: दूध, दही, पनीर, टोफू, कडधान्य, राजमा, चणादाळ, सोयाबीन, बदाम, अक्रोड, क्विनोआ
मांसाहारींसाठी: अंडी, चिकन, मासे, मटण
सप्लिमेंट्स: डॉक्टरच्या सल्ल्याने प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्सचा वापर करता येतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. दैनिक गोमन्तक अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.