Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Elephant Cricket Video: क्रिकेटची ही आवड हत्तीलाही प्रभावित करु शकते? होय, सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Elephant Cricket Video: भारतात क्रिकेट खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, क्रिकेटची ही आवड हत्तीलाही प्रभावित करु शकते? होय, सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले पावसात हत्तीसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. गजराजची अफलातून फलंदाजी पाहून अनेकजण चकित झाले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Viral Video
Viral Video|6 6 6 2 2 6: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा गर्दा, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूची बॅट तळपली

गजराजाची शानदार फलंदाजी

दरम्यान, ही मजेदार घटना कुठे घडली याबाबत काही माहिती नाही, परंतु व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की, पावसाच्या सरींमध्ये काही मुलांनी त्यांचा मित्र "गजराज"ला क्रिकेट बॅट दिली. व्हिडिओमध्ये हत्ती सोंडेत बॅट धरुन चेंडू मारतो. हास्य आणि मजेने भरलेल्या या अनोख्या सामन्याचा व्हिडिओ पाहून लोक आनंदाने नाचत आहेत. गजराज सांगतो की, "दादा चेंडू थोडा वेगाने फेक, माझा शॉट पाहा!"

Viral Video
Goa Pune Flight: हवेतील थरार! गोवा - पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली; धक्कादायक Video Viral

गजराजची अद्भुत फलंदाजी पाहून लोकांनी त्याला 'जंगलातील धोनी' म्हटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला. काही जण याला "हत्तीचा हेलिकॉप्टर शॉट" म्हणत आहेत, तर काही गजराजला "जंगलाचा धोनी" म्हणत आहेत. एका यूूजरने विनोदाने लिहिले की, "आता आयपीएलमध्ये (IPL) एका नवीन संघाची गरज आहे, गजराज इलेव्हन!" त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले की, "पावसात भिजून क्रिकेट खेळणे ठीक आहे, गजराजाने धमाकेदार षटकार मारला!" या व्हिडिओला हजारो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत आणि लोक पोटधरुन हासत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @epic.insta.daily नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com