Submerged at Chorao Island Ferryboat Toed Out after 11 days
Submerged Ferryboat Toed OutDainik Gomantak

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Goa News: नदीपरिवहन खात्याने नियुक्त केलेल्या विनयदीप एंटरप्रायझेस व वास्कोच्या कनिष्का साल्वेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे फेरीबोट बाहेर काढली.
Published on

पणजी: चोडण जेटीजवळ बुडालेली 'बेती" फेरीबोट ११ दिवसानंतर पाण्याबाहेर काढण्यात शुक्रवारी (०४ जुलै) यश आले. यासाठी २० लाखांहून अधिक खर्च आला आहे. फेरीबोटीच्या तळाला किंवा बाजूच्या भागात कोणतेही छीद्र आढळले नाही. त्यामुळे घटनेला जबाबदार कोण, याचा शोध नदी परिवहन खात्याला घ्यावा लागणार आहे.

येथे पाहा व्हिडिओ

फेरीबोट कधी पाण्याबाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नदीपरिवहन खात्याने नियुक्त केलेल्या विनयदीप एंटरप्रायझेस व वास्कोच्या कनिष्का साल्वेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे फेरीबोट बाहेर काढली. त्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.

टग बोटीद्वारे ती फेरीबोट दुपारी बेती येथील फेरीबोट कार्यशाळेत नेण्यात आल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी "गोमन्तक "ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com