Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Today's News Live Updates: गोव्यातील राजकारण, समाजकारण, पर्यटन, गुन्हे, अपघात, मान्सून तसेच विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.
Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

अडवलपाल गावातील नळांतून गढूळ पाण्याचा पुरवठा. अस्नोडे प्रकल्पातून होतोय पाणीपुरवठा. गावातील 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या निर्माण झाल्याची शक्यता.

Kadamba Buses: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

१५ वर्षापेक्षा जुन्या असलेल्या कदंब बस सरकारने भंगारात काढण्याटे आदेश दिले असून, ५४ बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. या बसेसची जागा इलेक्ट्रिक बस घेणार आहेत. याशिवाय ६० नवीन बस कदंबच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. 

ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ असलेल्या उतारावर ट्रक दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. अपघाताबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

लग्नाचे आमिष देऊन बलात्कार, छत्तीसगडच्या तरुणाला गोव्यात अटक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी २६ वर्षीय छत्तीसगडच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कंळगुट येथील व्हिलामध्ये २०२२ ते २०२५ दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सुरुवातीला मुंबईत गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर गोव्यात वर्ग करण्यात आला.

अखेर अकरा दिवसानंतर चोडण येथे बुडालेली बोट बाहेर काढण्यास यश

चोडण येथे बुडालेली फेरी बोट अखेर अकरा दिवसानंतर बाहेर काढण्यास यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते, यात काही अडचणी येत असल्याने वेळ लागला होता.

ED Raid: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

गोव्यातील जमीन हडप प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने पर्वरीत संदिप वझरकर आणि संबंधितांवर धाड टाकली आहे. संशयितांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर ईडीने झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Goa Police: 24 तास दक्ष! गोवा पोलिसांचे नाईट पेट्रोलिंग

गोवा पोलिस रात्रीचे पेट्रोलिंग करत असतानाचे ट्विट उत्तर गोवा पोलिसांच्या वतीने शेअर करण्यात आले आहे.

सराईत गुंड टारझन विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

सराईत गुंड टारझन पार्सेकर याच्याविरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. टारझनच्या नागवा येथील अड्डयावर ९५ सेमी लांबीची तलवार आढळून आली आहे. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

ओपा येथील पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड झाला आहे. यामुळे तिसवाडी, फोंडा तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पिण्याचे पाणी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com