warm water Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे किती फायदेशीर?

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होते असे मानले जाते पण खरंच असे आहे का ? वाचा तज्ञ काय सांगतात.

Puja Bonkile

Morning Tips: अनेक लोक चहा किंवा कॉफीने तर काही लोक गरम पाण्याने सकाळची सुरुवात करतात. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. 

असे काही लोक आहेत जे सकाळी कोमट पाण्याऐवजी सामान्य पाण्याला महत्त्व देतात. आपले वडील अनेक शतकांपासून सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी सेवन करत आले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. चला मग जाणून घेऊया सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाणी का प्यावे? शरीराला याचे कोणते फायदे मिळतात.

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी का प्यावे? 

  • पचन आणि चयापचय

​​दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

  • डिटॉक्सिफिकेशन

कोमट पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. म्हणजेच जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायले तर तुमचे शरीर आपोआप डिटॉक्स होईल. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येणे सुरू होते. यामुळे शरीरात साचलेली घाण घामाद्वारे बाहेर पडते.   

  • वजन कमी होते

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. तसेच यामुळे भूक देखील नियंत्रित करण्याची आणि जास्त प्रमाणात न खाण्याची भावना विकसित होते. कोमट पाणी पचनसंस्था सुरळित करण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करते. 

  • हायड्रेशन

सकाळी लवकर उठून कोमट पाणी प्यायल्यानेही शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. हायड्रेटेड राहिल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

SCROLL FOR NEXT