कोलोरेक्टल कर्करोग दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करत आहे. अलिकडेच एका संशोधनातून या आजाराच्या संदर्भात मोठा खुलासा झाला. संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी या कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी घेतल्यास कोलन कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. चला तर मग हा कोलन कर्करोग काय आहे? व्हिटॅमिन डी त्यासाठी कसे प्रभावी ठरते? तसेच, या आजाराला प्रतिबंध करण्याची पद्धती काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
कोलन कर्करोग ज्याला मोठ्या आतड्याचा कर्करोग किंवा कोलोरेक्टल कर्करोग असेही म्हणतात, तो आपल्या पचनसंस्थेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या दुव्यावर होतो. जेव्हा कोलन किंवा मलाशयाच्या आतील अस्तरातील सामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हा कर्करोग होतो. सुरुवातीला तो पॉलीप्सच्या रुपात दिसू लागतो. कालांतराने त्याचे रुपांतर कर्करोगात होते. हा कर्करोग अस्वास्थ्यकर आहार (Diet), लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशशास्त्रामुळे होऊ शकतो.
द नेचर या मेडिकल जर्नलनुसार, व्हिटॅमिन डी केवळ हाडे मजबूत करण्यापुरतेच मर्यादित नाही. हे एका हॉर्मोनसारखे कार्य करते. सेल्स डिव्हीजन, डीएनए आणि रोगप्रतिकारक शक्तीचे निरीक्षण यांसारख्या अनेक महत्वाच्या शरीराच्या कार्यांमध्ये संतुलन साधते. याशिवाय, व्हिटॅमिन डी पेशींना वाढण्यापासून रोखणाऱ्या p21, p27 सारख्या जनुकांना सक्रिय करते. यामुळे पेशी चक्र थांबते आणि कर्करोगाच्या (Cancer) पेशींच्या निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच, व्हिटॅमिन डी मॅक्रोफेज आणि टी-पेशींसारख्या रोगप्रतिकारक पेशींना देखील सक्रिय करते. या पेशी शरीरातील हानीकारक पेशी ओळखून त्यांचा नाश करतात.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी दाहक-विरोधी सायटोकिन्स वाढवून हानिकारक सायटोकिन्स कमी करते. यामुळे कोलनचे वातावरण निरोगी राहते आणि जळजळ कमी करते. व्हिटॅमिन डी डीएनएला नुकसान होण्यापासून वाचवून दुरुस्तीची प्रक्रिया देखील वेगवान करते.
दररोज 15-30 मिनिटे सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा.
अंडी, मशरुम, फोर्टिफाइड दूध आणि फॅटी मासे यासारखे व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्हिटॅमिन डी3 सप्लिमेंट्स घेऊ शकता.
शारीरिक हालचाली केवळ शरीर सक्रिय ठेवत नाहीत तर कर्करोगाचा धोका देखील कमी करतात.
जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला कोलन कर्करोग झाला असेल तर वेळोवेळी त्याची तपासणी करा.
धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा, हे दोन्ही कोलन कर्करोगासाठी प्रमुख जोखीम घटक मानले जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.