Virat Kohli Fitness Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Virat Kohli Fitness Video: विराट कोहली स्वतःला कसा फिट ठेवतो? पाहा व्हिडिओ

विराट कोहली हा फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य काय आहे.

Puja Bonkile

Virat Kohli Fitness Video: टीम इंडियाचा आघाडीचा आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आज 35वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली हा फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. विराट फिट राहण्यासाठी व्यायाम आणि खाण्या-पिण्यावर खुप लक्ष देतो. तसेच विराट सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो सोशल मिडियावर फिटनेसचे व्हिडिओ देखील शेअर करत असतो.

विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य 

विराट कोहली फिट राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाबाबत खुप सक्रिय आहे. विराट 35 व्या वर्षी देखील फिट दिसतो, कारण तो योग्य आहार घेतो. विराट दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तो 90 टक्के उकडलेल्या पदार्थांचे सेवन करतो. व्यायाम किंवा जिम केल्यानंतर प्रोटीन शेक, सोय मिल्क, आणि चीज यासारख्या पदार्थांचे सेवन करतो. तसेच विराट जंक फुड, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळतो.

विराट नियमितपणे व्यायाम करतो. तो सुट्टीच्या दिवशी देखील व्यायम करण्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर टाकतो. एरोबिक्स आणि योगासने करण्यासोबतच विराट वॉर्मअप देखील करतो.

या व्हिडिओमध्ये विराट ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे.

ट्रेडमिलवर धावण्याचे फायदे कोणते

  • ट्रेडमिलवर धावल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

  • स्नायु मजबुत होतात.

  • मानसिक आरोग्य चांगले राहते.

  • तणाव कमी होतो.

 एवढेच नाही तर विराट स्क्वॅट्स, वेट ट्रेनिंग, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट करतांनाचे व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असतो.

या व्हिडिओमध्ये तो वेट लिफ्टिंग करतांना दिसत आहे.

या फोटोमध्ये विराट डंबेल्स घेऊन व्यायम करतांना दिसत आहे.

दरम्यान, सध्या विराट वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. यंदा विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळतांना दिसत आहे. त्याने वर्ल्डकप 2023 मध्ये 400 धावांचा टप्पांही पार केला आहे. तो वाढदिवशी देखील द.आफ्रिकेसोबत सामना खेळतांना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

Indian Tribes: 'आफ्रिकेतून बाहेर पडलेले मानव भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याने गेले असतील'; वेतुवन, इरुला आणि कुरुंबार

SCROLL FOR NEXT